Join us   

काळा - पिवळा गूळ पाहिला असेल पण गुळाचे ५ प्रकार खाल्ले आहेत का? आरोग्यासाठी नेमका कोणता गूळ उत्तम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 2:37 PM

1 / 11
हिवाळ्यात गूळ खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सुक्रोज, ग्लूकोज, लोह तसेच शरीराला आवश्यक असणारी खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. गूळ हा साखरेला सर्वात आरोग्यदायी आणि उत्तम पर्याय आहे. गुळात नैसर्गिक गोडवा असतो जो खायला चविष्ट आणि शरीरासाठी फायद्याचाही असतो. मुखत्वे करून उसाच्या रसापासून गूळ बनविला जातो. ऊसाचा रस काढून त्याला मोठ्या कढईत तापवून काही प्रक्रिया केल्यावर गूळ तयार होतो त्यास 'गुळाची ढेप' म्हणतात. (5 Different Types of Jaggery You Should Try).
2 / 11
ऊस दोन प्रकारचे असतात; एक जांभळा आणि एक हिरवा. या दोन्ही प्रकारच्या ऊसापासून वेगवेगळ्या चवीचा गूळ बनतो.
3 / 11
खजुराचा रस काढून त्यापासून खजुराचा गूळ तयार केला जातो. या गुळात प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन - बी,फायबरची मात्रा अधिक असते. याचे रोज सेवन केल्यास तुमच्या शरीरात आयर्नची कमी कधीच नाही भासणार.
4 / 11
उसाच्या रसापासून गूळ तयार करणे ही गूळ बनविण्याची एक पारंपरिक पद्धत आहे. भारतीय आहारात या गुळाला विशेष महत्व आहे.
5 / 11
पश्चिम बंगालमध्ये नारळाच्या रसापासून तयार केलेला गूळ जास्त प्रमाणात वापरला जातो. नारळाचा गुळ हा आंबलेल्या रसापासून बनवला जातो. हा गूळ थोडा कडक असतो. नारळाच्या गुळामध्ये लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असत. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत, जे खोकला आणि सर्दी यांसारख्या आजारांवर चांगला घरगुती उपाय म्हणून उपयुक्त आहे.
6 / 11
केरळमधील मरयुर येथे पिकणारा ऊस फार प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात या गुळाला जास्त पसंती दिली जाते. 'मरयुर मुथुवा ' नामक जातीचे शेतकरी हा गूळ तयार करतात म्हंणून या गुळाला मरयुर असे नाव पडले.
7 / 11
सेंद्रिय गुळाला काळा गूळ असे म्हटले जाते. ऊसाचा रस हा कायम थोडासा काळा असतो. काळा रस हा उत्तम आणि खरा मानला जातो. त्यामुळे अगदी शुद्ध पद्धतीने केलेल्या गुळाला काळा गुळ असे म्हटले जाते.सेंद्रीय पद्धतीने तयार केलेला गुळ हा थोडासा तपकीरी, काळा आणि हाताला मऊ असतो. त्याचे तुकडे करणे सहज सोपे जाते.
8 / 11
बाजारात मिळणारा गूळ हा भेसळयुक्त असू शकतो. गूळ भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक कप पाणी घ्या. त्यात गुळाचा खडा टाका. जर तुमच्या गुळात कोणत्याही प्रकारची भेसळ असेल तर तो भांड्याच्या तळाशी जाईल. परंतु जर गूळ शुद्ध असेल तर तो संपूर्णपणे पाण्यात विरघळून जाईल.
9 / 11
बाजारातील गूळ खरेदी करताना त्यावरील लेबल वाचायला विसरू नका. यामुळे गूळ बनवताला कोणते घटक वापरले आहेत याचा अंदाज तुम्हाला येईल.
10 / 11
पचनक्रियेवर चांगला परिणाम करण्यासाठी सेंद्रीय गुळ फायद्याचा ठरतो. जर तुम्ही सेंद्रीय गुळाचे सेवन केले तर तुम्हाला पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत मिळते.
11 / 11
गुळामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट घटक जास्त असतात. ज्यामुळे त्वचा आणि केस चांगले राहण्यास मदत मिळते.
टॅग्स : अन्नआरोग्यहेल्थ टिप्स