तुम्हाला जीवापाड आवडणारे ६ पदार्थ मूळचे भारतीय नाहीत, ठेवाल विश्वास? पाहा फोटो..

Published:March 10, 2023 04:27 PM2023-03-10T16:27:54+5:302023-03-10T16:34:54+5:30

6 Foods You Love Most Are Not Indian, Can You Believe? जिलेबी, गुलाब जामसारखे पदार्थ भारतीय नसून, त्यांचा शोध इतर देशात झाला आहे..

तुम्हाला जीवापाड आवडणारे ६ पदार्थ मूळचे भारतीय नाहीत, ठेवाल विश्वास? पाहा फोटो..

समोसा, गुलाब जाम, जिलेबी, हे खाद्यपदार्थ पाहताच तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा. भारतातील गल्लोगल्लीत स्ट्रीटफूड फार फेमस आहे. आपल्या देशात मसाल्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र आपण आज आपले मानलेले काही पदार्थ आपले नाहीच तर त्यांची मुळं दूर विदेशात आहे आणि मग ते आपल्यापर्यंत पोहचले आपलेच झाले. अर्थात याबद्दल अनेकदा फूड एक्सपर्टमध्येही वाद दिसतात. त्याविषयी उलटसुलट चर्चा होते. पण तरी काही असे पदार्थ जे मूळ भारतीय नाहीत(7 Foods You Love Most Are Not Indian).

तुम्हाला जीवापाड आवडणारे ६ पदार्थ मूळचे भारतीय नाहीत, ठेवाल विश्वास? पाहा फोटो..

समोसा हा पदार्थ भारतात आवडीने खाल्ला जातो. समोसा हा डिश भारतीय नसून, याचे मूळ इराणी आहे. 'समोसा' हा पर्शियन शब्द 'संबुसक' या शब्दापासून आला आहे. पहिले समोसा नॉन - वेज पदार्थाचा वापर करून तयार होत असे. पण त्यानंतर त्यात इतर मसाले व बटाट्याचा वापर करून बनवायला सुरुवात झाली.

तुम्हाला जीवापाड आवडणारे ६ पदार्थ मूळचे भारतीय नाहीत, ठेवाल विश्वास? पाहा फोटो..

जिलेबी हा गोड पदार्थ भारतीय लोकांमध्ये फार फेमस आहे. ज्याला बंगालमध्ये जिलापी आणि आसाममध्ये जलेपी म्हणूनही ओळखले जाते. जलेबीची ऐतिहासिक सुरुवात मध्यपूर्वेमध्ये झाली. अरबी पाककृती पुस्तक 'किताब अल-ताबीख'मध्ये मध्य पूर्वेतील जलाबीह अशाच नावाच्या डिशचा उल्लेख आहे.

तुम्हाला जीवापाड आवडणारे ६ पदार्थ मूळचे भारतीय नाहीत, ठेवाल विश्वास? पाहा फोटो..

बिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे. मुस्लीम राजवटीत त्याची मूळं सापडतात.

तुम्हाला जीवापाड आवडणारे ६ पदार्थ मूळचे भारतीय नाहीत, ठेवाल विश्वास? पाहा फोटो..

राजमा चावल अत्यंत प्रिय. पण राजमा बिन्स हा पोर्तुगालहून भारतात आला आणि हे उकळून शिजवण्याची पद्धत मेक्सिकोतून आली.

तुम्हाला जीवापाड आवडणारे ६ पदार्थ मूळचे भारतीय नाहीत, ठेवाल विश्वास? पाहा फोटो..

मऊ साखरेच्या पाकात बुडालेले खव्याचे मऊ गुलाबजाम तोंडात टाकताच विरघळतात. सण असो किंवा कार्यक्रम, अशा प्रसंगी गुलाब जाम भारतात आवर्जून बनले जाते. मात्र, हा पदार्थ भारतीय नसून, फारसी देशांमधून आला आहे. फारसी देशामध्ये गुलाबजामला लोकमा आणि लुकमत-अल-कादी असं म्हटलं जातं.

तुम्हाला जीवापाड आवडणारे ६ पदार्थ मूळचे भारतीय नाहीत, ठेवाल विश्वास? पाहा फोटो..

वाफाळलेल्या चहाशिवाय अनेकांची सकाळ होत नाही. सर्वप्रथम, चहा चीन या देशात बनवण्यात आला होता. एका पौराणिक कथेनुसार, सुमारे २७०० ईसापूर्व, चिनी शासक शेन नुंग बागेत बसून गरम पाणी पीत होते. त्यानंतर एका झाडाचे एक पान पाण्यात पडले, आणि त्याचा रंग बदलला व वासही आला. राजाने जेव्हा त्याचा आस्वाद घेतला तेव्हा त्याला त्याची चव खूप आवडली. अशा प्रकारे चहाचा शोध लागला.