Maharashtrian food : मराठी स्वयंपाकघरात हमखास केल्या जाणाऱ्या भाकरींचे ६ प्रकार; भाकरी खा-वजन वाढणारच नाही!
Updated:March 4, 2025 15:07 IST2025-03-04T14:57:05+5:302025-03-04T15:07:14+5:30
6 types of Maharashtrian traditional Bhakri : Maharashtrian cuisine, Maharashtrian food, Maharashtrian traditional food, Marathi food : मराठी स्वयंपाकघरात हमखास केलेल्या जाणाऱ्या भाकरींचे पारंपरिक प्रकार

असे म्हणतात पोळीपेक्षा भाकरी जास्त पौष्टिक असते. भाकरीचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या पोषणसत्वांनी भरलेले आहे. असे हे Maharashtrian traditional food आहे.
महाराष्ट्रात तसेच इतर काही राज्यांमध्येही भाकरी रोजच्या आहाराचा भाग आहे. पारंपारिक थापलेली भाकरी चविष्ट असतेच शिवाय Maharashtrian cuisine पोटभरीचे असते.
विविध धान्यांपासून भाकरी तयार केली जाते. भाकरीचे सात प्रकार जाणून घेऊया.
१. सर्वांनाच माहिती असलेली भाकरी म्हणजे तांदळाची भाकरी. मस्त मऊ अशी ही भाकरी फारच खुसखुशीत असते.
२.प्रचंड पौष्टिक अशी भाकरी म्हणजे ज्वारीची भाकरी. महाराष्ट्रातील गावागावात ही तयार केली जाते.
३. नाचणीची भाकरी वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्यांनी खावी. अशक्तपणा येणार नाही. पोट भरेल. वजन कमी करण्यातही मदत होईल.
४. ज्वारीच्या पीठात अख्खे काळे उडीद घातले जातात. इतरही काही कडधान्ये घालून कळण्याची भाकरी तयार केली जाते. प्रचंड पौष्टिक असते.
५. शरीराला भरपूर जीवनसत्त्व तसेच जस्त, पोटॅशियम, खनिजे याने परिपूर्ण अशी भाकरी म्हणजे मक्याची भाकरी. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते.
६. बाजरीची भाकरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. रक्तातील साखर नियंत्रित राहते. यात लोह भरपूर असते.