कांद्याचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? पाहा कोणत्या पदार्थासाठी कोणता कांदा वापरायचा?

Published:December 28, 2023 09:10 AM2023-12-28T09:10:58+5:302023-12-28T16:27:53+5:30

कांद्याचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? पाहा कोणत्या पदार्थासाठी कोणता कांदा वापरायचा?

साधा कांदा, पांढरा कांदा, कांद्याची पात असे कांद्याचे मोजकेच प्रकार आपल्याला माहिती असतात.

कांद्याचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? पाहा कोणत्या पदार्थासाठी कोणता कांदा वापरायचा?

पण त्या व्यतिरिक्तही कांद्याचे इतर अनेक प्रकार आहेत. त्याची चव आणि गुणधर्म वेगवेगळे असतात. म्हणूनच आपण कोणता पदार्थ करणार त्यानुसार जर योग्य कांद्याची निवड केली तर नक्कीच तुम्ही करताय तो पदार्थ आणखी चवदार होऊ शकतो.

कांद्याचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? पाहा कोणत्या पदार्थासाठी कोणता कांदा वापरायचा?

पांढरा कांदा हा थोडा गोड चवीचा असतो. त्यामुळे तो सलाड, कोशिंबीर, भेळ या पदार्थांसाठी वापरावा.

कांद्याचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? पाहा कोणत्या पदार्थासाठी कोणता कांदा वापरायचा?

लाल कांदा थोडा तिखट असतो. बऱ्याचदा तो कच्चा खाण्यासाठी वापरल्या जातो. ग्रेव्हीसाठी वापरायलाही तो चांगला आहे.

कांद्याचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? पाहा कोणत्या पदार्थासाठी कोणता कांदा वापरायचा?

पिवळसर कांदा जो असतो तो वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वापरावा. कारण त्याला एकदम जास्त गंध असतो. सूप आणि सॉस यासाठीही तो चांगला आहे.

कांद्याचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? पाहा कोणत्या पदार्थासाठी कोणता कांदा वापरायचा?

स्वीट ओनियन हा थोडा केशरी छटेचा असतो. फ्राय करण्यासाठी, रोस्ट करून इतर रेसिपींमध्ये टाकायला तो चांगला आहे.

कांद्याचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? पाहा कोणत्या पदार्थासाठी कोणता कांदा वापरायचा?

कांद्याची पात टॉपिंग म्हणून वापरायला छान आहे. तसेच कोशिंबीर, चायनिज पदार्थांना सुगंध आणण्यासाठी तिचा छान उपयोग होतो.

कांद्याचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? पाहा कोणत्या पदार्थासाठी कोणता कांदा वापरायचा?

शॅलोट प्रकारातले कांदे म्हणजे आकाराने थोडे लहान आणि लंबगोल असणारे कांदे. हे कांदेही गार्निशिंग, टॉपिंगसाठी उत्तम आहेत.