कांद्याचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? पाहा कोणत्या पदार्थासाठी कोणता कांदा वापरायचा? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 9:10 AM 1 / 8साधा कांदा, पांढरा कांदा, कांद्याची पात असे कांद्याचे मोजकेच प्रकार आपल्याला माहिती असतात. 2 / 8पण त्या व्यतिरिक्तही कांद्याचे इतर अनेक प्रकार आहेत. त्याची चव आणि गुणधर्म वेगवेगळे असतात. म्हणूनच आपण कोणता पदार्थ करणार त्यानुसार जर योग्य कांद्याची निवड केली तर नक्कीच तुम्ही करताय तो पदार्थ आणखी चवदार होऊ शकतो. 3 / 8पांढरा कांदा हा थोडा गोड चवीचा असतो. त्यामुळे तो सलाड, कोशिंबीर, भेळ या पदार्थांसाठी वापरावा.4 / 8लाल कांदा थोडा तिखट असतो. बऱ्याचदा तो कच्चा खाण्यासाठी वापरल्या जातो. ग्रेव्हीसाठी वापरायलाही तो चांगला आहे.5 / 8पिवळसर कांदा जो असतो तो वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वापरावा. कारण त्याला एकदम जास्त गंध असतो. सूप आणि सॉस यासाठीही तो चांगला आहे.6 / 8स्वीट ओनियन हा थोडा केशरी छटेचा असतो. फ्राय करण्यासाठी, रोस्ट करून इतर रेसिपींमध्ये टाकायला तो चांगला आहे.7 / 8कांद्याची पात टॉपिंग म्हणून वापरायला छान आहे. तसेच कोशिंबीर, चायनिज पदार्थांना सुगंध आणण्यासाठी तिचा छान उपयोग होतो. 8 / 8शॅलोट प्रकारातले कांदे म्हणजे आकाराने थोडे लहान आणि लंबगोल असणारे कांदे. हे कांदेही गार्निशिंग, टॉपिंगसाठी उत्तम आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications