1 / 9नाश्त्याला चवदार, मऊसूत इडली आणि त्यासोबत गरमागरम सांबार आणि चटणी मिळाली तर क्या बात है! इडली प्रेमींसाठी तर यापेक्षा चवदार नाश्ता दुसरा कोणताच नाही.(6 types of south Indian idli perfect for weight loss and breakfast)2 / 9शिवाय इडली अतिशय पौष्टिकसुद्धा असते. कारण त्यामध्ये पचनक्रिया सुधारण्यासाठी आवश्यक असणारे पौष्टिक घटक पुरेशा प्रमाणात असतात. याशिवाय त्यामध्ये फायबरही भरपूर असतात. त्यामुळे आठवड्यातून एक- दोनदा तरी इडली खायलाच हवी..(different types of instant idlis for breakfast)3 / 9डाळ- तांदूळ भिजत घालून त्याची इडली तर आपण नेहमीच करतो. पण त्या व्यतिरिक्त इडलीचे हे काही वेगवेगळे प्रकारही तुम्ही ट्राय करून पाहू शकता. 4 / 9थत्ते इडली हा एक प्रकार तुम्हाला नक्कीच आवडू शकतो. ही इडली आकाराने थोडी मोठी असते आणि जास्त मऊ असते. सांबर मसाला आणि तूप घालून ती सर्व्ह केली जाते. 5 / 9दुसरी आहे रवा इडली. ही इन्स्टंट इडली तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता. यासाठी रवा ताकामध्ये काही वेळ भिजत घालायचा आणि त्याची गरमागरम इडली करायची.6 / 9कांचीपुरम इडली हा प्रकारही तुम्ही ट्राय करून पाहू शकता. ही इडली जिरेपूड, मिरेपूड, आल्याची पेस्ट आणि कढीपत्ता घालून तयार केली जाते आणि केळीच्या पानांमध्ये ती वाफवली जाते.7 / 9नाचणीचे पीठ दह्यामध्ये किंवा ताकामध्ये भिजत घालायचे आणि त्याची गरमागरम इंस्टंट रागी इडली करायची. वेटलॉस करणाऱ्यांसाठी ही इडली खूप उपयुक्त ठरते. 8 / 9ओट्स पाण्यात काही काळ भिजत घालून त्याचीही तुम्ही मस्त ओट्स इडली करू शकता. 9 / 9आपल्या नेहमीच्याच इडलीला आणखी थोडसं पौष्टिक करायचं असेल तर त्यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या घालू शकता. गाजर, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, पत्ताकोबी यासारख्या तुमच्या आवडीच्या भाज्या घालून तुम्ही इडली करू शकता.