ना टॉनिक ना गोळ्या...शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतात या 7 नॅचरल गोष्टी!

Updated:March 21, 2025 12:13 IST2025-03-21T12:06:43+5:302025-03-21T12:13:47+5:30

Natural Blood Purifier : रक्त शुद्ध ठेवण्यासाठी काही टॉनिक किंवा औषध घेण्याची गरज नाही. कारण काही नॅचरल गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही हे काम करू शकता.

ना टॉनिक ना गोळ्या...शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतात या 7 नॅचरल गोष्टी!

Natural Blood Purifier : रक्त हे जीवन आहे...हे वाक्य तर तुम्ही अनेकदा वाचलेलं असेल. पण तरी शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आपण किती काळजी घेतो? असा प्रश्न आहे. रक्त शुद्ध नसेल तर वेगवेगळे आजार होतात, सोबतच त्वचेसंबंधी अनेक समस्या होतात. त्यामुळे आरोग्य सांभाळत असताना रक्त शुद्ध ठेवण्यासाठी काही गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. रक्त शुद्ध ठेवण्यासाठी काही टॉनिक किंवा औषध घेण्याची गरज नाही. कारण काही नॅचरल गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही हे काम करू शकता. आता तुम्हाल कोणत्या गोष्टी? तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ना टॉनिक ना गोळ्या...शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतात या 7 नॅचरल गोष्टी!

ब्रोकली ही भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. ही भाजी शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आणि रक्तातील विषारी तत्व नष्ट करण्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. या भाजीमध्ये अनेक पोषक तत्व जसे की, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, व्हिटॅमिन के, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, पोटॅशिअम, मॅगनीज, फॉस्फोरस असतात. अशात या भाजीचा नेहमीच्या आहारात समावेश केल्यास रक्त तर शुद्ध होतच, सोबतच शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात.

ना टॉनिक ना गोळ्या...शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतात या 7 नॅचरल गोष्टी!

लिंबू पाणी तर तुम्ही अनेकदा प्यायले असाल. वजन कमी करायचं असेल, शरीर हायड्रेट ठेवायचं असेल, बॉडी डिटॉक्स करायची असेल तर लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच लिंबू पाण्यानं शरीरात रक्त शुद्ध राहण्यासही मदत मिळते. रोज लिंबाचा रस गरम पाण्यात मिश्रित करून प्यायल्यास रक्त शुद्ध होतं.

ना टॉनिक ना गोळ्या...शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतात या 7 नॅचरल गोष्टी!

आले सुद्धा नॅचरल ब्लड प्यूरिफायर म्हणून ओळखलं जातं. आल्याचं सेवन केल्यानं रक्त शुद्ध होण्यासोबतच नवीन पेशीही तयार होतात. आलं चवीला तिखट असलं तरी थोड्या प्रमाणात कच्च खाल्ल्याने अधिक फायदा होतो.

ना टॉनिक ना गोळ्या...शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतात या 7 नॅचरल गोष्टी!

गाजर हे एक असं कंदमूळ आहे ज्यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. गाजरानं शरीरातील रक्त शुद्ध राहतं. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम, फायबर, बायोटिन, व्हिटॅमिन सी, मॅगनीज, फॉस्फोरस सारखे पोषक तत्व असतात.

ना टॉनिक ना गोळ्या...शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतात या 7 नॅचरल गोष्टी!

काही रिसर्चनुसार, बिटाचा ज्यूस नियमितपणे प्यायल्यास बॉडी डीटॉक्स करण्यास मदत मिळते. याने रक्त शुद्ध होतं आणि लिव्हरही निरोगी राहतं. बीट तुम्ही जेवणासोबत कच्चही खाऊ शकता.

ना टॉनिक ना गोळ्या...शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतात या 7 नॅचरल गोष्टी!

गूळ रक्त शुद्ध करण्याचा बेस्ट नैसर्गिक उपाय मानला जातो. गुळात असलेलं आयर्न रक्तातील हीमोग्लोबिनचं प्रमाण वाढवतं. त्यामुळे शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. सोबतच शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर पडतात.

ना टॉनिक ना गोळ्या...शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतात या 7 नॅचरल गोष्टी!

हळदीमध्ये अनेक औषधी गुण असतात. त्यामुळे आयुर्वेदातही हळदीला खूप महत्व आहे. नियमितपणे थोडी हळध दुधात टाकून प्यायल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते.