नवरात्रीला देवीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येणारे ८ गोड पदार्थ- कमी वेळेत करा चवदार नैवेद्य.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2024 4:18 PM 1 / 10नवरात्रीला काही घरांमध्ये नऊ दिवस उपवास असतात तर काही घरांमध्ये दररोज देवीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. 2 / 10तुम्हालाही नवरात्रीमध्ये देवीसाठी रोज एक वेगळा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून करायचा असेल तर ही घ्या कमीतकमी वेळेत होणाऱ्या चवदार गोड पदार्थांची यादी..(7 most easy and simple recipe for navratri naivedya)3 / 10या यादीमधला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे शिरा. शिरा करायला खरंच खूप कमी आणि कमी साहित्य लागते. 4 / 10बाजारातून विकतचं चक्का दही आणल्यास देवीसाठी तुम्ही अगदी १० मिनिटांत श्रीखंडाचा नैवेद्य करू शकता.5 / 10नैवेद्यासाठी करता येण्यासारखा आणखी एक सोपा पदार्थ म्हणजे बासुंदी. आता बासुंदीसाठी दूध आटवायला निश्चितच वेळ लागतो. पण ते गॅसवर एकदा उकळून ठेवलं की त्याकडे खूप लक्ष देण्याची गरज नसते. 6 / 10मखाना खीर हा देखील एक चांगला नैवेद्य आहे. शिवाय तो उपवास असणाऱ्यांनाही चालतो.7 / 10देवीसाठी तुम्ही शेवयाची खीर देखील करू शकता. अगदी १५ ते २० मिनिटांत शेवयाची छान खीर करता येते.8 / 10मिल्क पावडरचे चवदार पेढे हा नैवेद्यही तुम्ही करू शकता. बाजारात सणासुदीला पेढ्यांमध्ये खूप भेसळ करण्यात येते. त्यामुळे घरच्याघरी तयार केलेले पेढे कधीही चांगले.9 / 10शेंगदाण्याचा लाडूही तुम्ही नैवेद्यासाठी करू शकता. शिवाय तो खूप पौष्टिकही आहेच..10 / 10शेंगदाण्याच्या लाडूप्रमाणे सुकामेवा आणि खजूर घालूनही लाडू करू शकता. हे लाडू तर घरातल्या सगळ्यांसाठीच खूप आरोग्यदायी आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications