मकर संक्रांती स्पेशल : आजी करायची त्या पदार्थांची ही घ्या यादी, लहानपणच्या आठवणींचा गोडवा...
Updated:January 7, 2025 17:06 IST2025-01-07T16:34:52+5:302025-01-07T17:06:41+5:30
Makar Sankranti Special Recipe : 7 Must Have Makar Sankranti Sweets & Snacks dishes : 7 Traditional Foods To Have On Makar Sankranti 2025 : Makar Sankranti Special Food : मकरसंक्रांतीला तीळगुळाच्या लाडूसह केले जाणारे पाहा पारंपरिक पदार्थ

नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे (Makar Sankranti Special Food) मकरसंक्रांत. या सणादिवशी 'तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला' असं म्हणत ( 7 Must Have Makar Sankranti Sweets & Snacks dishes) सगळ्यांना तिळाचे लाडू व तिळगुळ वाटण्याची प्रथा आहे. मकरसंक्रांत (7 Traditional Foods To Have On Makar Sankranti 2025 ) हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला घरामध्ये खास पारंपरिक विविध प्रकारचे पदार्थ केले जातात. प्रामुख्याने तीळ आणि गूळ हे दोन पदार्थ वापरून अनेक गोडाधोडाचे पदार्थ या सणाला केले जातात. मकरसंक्रांतीला तिळाच्या लाडू सोबतच इतरही पदार्थ केले जातात हे पदार्थ नेमके कोणते ते पाहूयात.
१. तिळाचे लाडू :-
या पदार्थाशिवाय मकरसंक्रांत हा सण पूर्ण होऊच शकत नाही. मकरसंक्रांतीसाठी घरोघरी तिळाचे लाडू तयार केले जातात. तीळ शरीराला उष्णता देण्यासाठी फायदेशीर ठरतात. तिळामध्ये असलेले कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक आणि सेलेनियम यासारखे पौष्टीक घटक हृदयासाठी फायदेशीर ठरतात. गूळ आणि तीळ एकत्र करून लाडू तयार केले जातात.
२. तिळाची चिक्की :-
हिवाळ्यामध्ये आहारात तिळाचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात येतो. थंडीमध्ये शरीराला उष्णता देण्यासाठी गूळ आणि तीळ एकत्र करून तिळाची चिक्की तयार केली जाते.
३. चुरमुऱ्याचे लाडू :-
चुरमुऱ्याचे लाडू हे लहान मुलांना प्रचंड आवडतात. गुळाचा पाक आणि चुरमुरे वापरून गोड लाडू हे अनेकांच्या घरी खास मकरसंक्रांतीसाठी तयार केले जातात. चुरमुऱ्याचे लाडू हे शरीरासाठी उत्तम असतात.
४. गुळपोळी :-
गूळ, तीळ, भाजणीचे चण्याचे पीठ, वेलची पावडर, दाण्याचा कुट, खसखस, खोबरे वापरून गुळपोळी तयार केली जाते. गुळपोळी हा पौष्टीक पदार्थ घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अतिशय आवडतो.
५. शेंगदाण्याची चिक्की :-
मकरसंक्रांतीला शेंगदाणे, गूळ आणि तूप यांपासून शेंगदाण्याची चिक्की तयार केली जाते. शेंगदाण्याच्या चिक्कीमध्ये प्रोटीन्स आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असल्याने ती खाणे शरीरासाठी फायदेशीर असते.
६. पुरणपोळी :-
पुरणपोळी हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. सणासुदीला, नैवेद्याच्या स्वयंपाकात हमखास पुरणपोळी केली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पुरणपोळी तयार केली जाते.
७. तिळगुळाची करंजी :-
तीळ, सुकं खोबरं, ड्रायफ्रुटस आणि गूळ यांचं एकत्रित सारण तयार करून, रवा- बेसन पीठ एकत्रित करून त्याची छान पारी लाटून घेत त्यात तयार तिळाचे सारण भरून खमंग - खुसखुशीत करंज्या गरम तेलात तळून घ्याव्यात.