1 / 8उन्हाळ्यात जेवण कमी जातं आणि नेहमीच काहीतरी थंड खाण्याची, पिण्याची इच्छा होते. अशावेळी कोल्डिंक पिण्यावर भर देण्यापेक्षा काही पारंपरिक सरबतं करून प्या.. यामुळे शरीरातला दाह तर कमी होईलच पण आरोग्यालाही भरपूर लाभ मिळेल.(7 summer special traditional drinks)2 / 8पहिलं पेय म्हणजे उसाचा रस. या दिवसांत प्रत्येक शहरांतच अनेक रसवंती दिसतात. उसाच्या रसामध्ये थोडा लिंबाचा रस आणि थोडं मीठ घालून प्यायल्यास लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात मिळतं.(traditional drinks of summer that helps to keep body hydrated)3 / 8कोकम सरबतसुद्धा उन्हाळ्यात आवर्जून प्यावं. शरीरातली वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.4 / 8कैरीच्या पन्ह्यामधून भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोलाईट्स आणि मायक्रो न्युट्रियंट्स मिळतात. त्यामुळे अंगात एनर्जी टिकून राहण्यासाठी त्याची मदत होते.5 / 8बेलाचं सरबत हे सुद्धा उन्हाळ्यातलं एक पारंपरिक पेय आहे. पुर्वी हे पेय भरपूर प्रमाणात प्यायलं जायचं. पण आता मात्र बहुतांश लोकांना त्याची माहितीही नाही.6 / 8नारळाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात नॅचरल इलेक्ट्रोलाईट्स असतात. त्यामुळे अंगात एनर्जी टिकून राहण्यासाठी त्याची मदत होते.7 / 8ताक देखील उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आवर्जून प्या. ताक शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतं. अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी ताकाची मदत होते. शिवाय पित्त, वात, कफ अशा तिन्ही प्रकृतीच्या लोकांसाठी ताक आरोग्यदायी ठरतं. 8 / 8याशिवाय जवळपास प्रत्येकाच्याच घरी केलं जातं ते लिंबू पाणीही उन्हाळ्यात प्यायला हवं. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्याची मदत होते.