मखाण्याचे ७ प्रकार, पौष्टिक आणि चमचमीत चवीचे भन्नाट कॉम्बिनेशन, हिवाळा करा साजरा...

Published:January 3, 2023 02:48 PM2023-01-03T14:48:46+5:302023-01-03T15:11:55+5:30

7 Wonderful Makhana Recipe's For Winter Season : हिवाळ्यात मखाण्यापासून वेगवेगळे पदार्थ घरच्या घरी तयार करता येऊ शकतात.

मखाण्याचे ७ प्रकार, पौष्टिक आणि चमचमीत चवीचे भन्नाट कॉम्बिनेशन, हिवाळा करा साजरा...

आपण प्रत्येक ऋतूंनुसार आपला आहार बदलतो. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी आपल्या शरीराला गरम वस्तू आणि ऊर्जेची गरज असते. अशा परिस्थिती आपण हिवाळ्यात गूळ, तीळ, तूप, मध यांसारखे पदार्थ जास्त खातो. पॉपकॉर्न सारखे पांढर्‍या रंगाचे वजनाने अतिशय हलके असलेले हे मखाणे म्हणजे कमळाच्या बियाचं असतात. सेलिब्रिटी लोकांनी फिटनेसकरता डायटमध्ये समावेश केलेला अगदी लो कॅलरी फुड आयटम म्हणजे मखाणे अशी मखाण्याची ओळख करून देता येईल. हिवाळ्यात मखाणे खाणे शरीराला लाभदायक ठरते. हिवाळ्यात मखाण्यापासून वेगवेगळे पदार्थ घरच्या घरी तयार करता येऊ शकतात. मखाण्यापासून आपण कोणते पदार्थ तयार करू शकतो, हे समजून घेऊयात(7 Wonderful Makhana Recipe's For Winter Season).

मखाण्याचे ७ प्रकार, पौष्टिक आणि चमचमीत चवीचे भन्नाट कॉम्बिनेशन, हिवाळा करा साजरा...

हिवाळ्यात गूळ खाणे शरीराला लाभदायक ठरते. गुळाचा पातळ पाक करून घ्या. त्या पाकात भाजलेलं मखाणे व थोडेसे सफेद तीळ टाकून परतून घ्या. गुळाच्या पाकातील मखाणे हे चवीला कॅरेमलाइस्ज्ड पॉपकॉर्नसारखेच लागतात. कॅरेमलाइस्ज्ड पॉपकॉर्न खाण्यापेक्षा गुळाच्या पाकातील मखाणे खाणे शरीराला उत्तम आहे.

मखाण्याचे ७ प्रकार, पौष्टिक आणि चमचमीत चवीचे भन्नाट कॉम्बिनेशन, हिवाळा करा साजरा...

एका कढईत तूप घेऊन त्यात तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुटस घाला. मग त्यात भाजलेले मखाणे घालून ड्रायफ्रुटस व मखाणे एकत्रित तुपामध्ये परतून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून घ्या. नमकीन मखाणे खाण्यासाठी तयार आहेत. चिवडा, फरसाण यांना पर्याय म्हणून नमकीन मखाणे खाऊ शकता.

मखाण्याचे ७ प्रकार, पौष्टिक आणि चमचमीत चवीचे भन्नाट कॉम्बिनेशन, हिवाळा करा साजरा...

कांदा, टोमॅटो यांची एकत्रित ग्रेव्ही तयार करून त्यात मटार आणि मखाणे घाला. गरमागरम तूप लावलेल्या चपात्या किंवा पराठ्यांसोबत ही रस्सा भाजी खूप चांगली लागते.

मखाण्याचे ७ प्रकार, पौष्टिक आणि चमचमीत चवीचे भन्नाट कॉम्बिनेशन, हिवाळा करा साजरा...

क्रिमी, मलईदार घट्ट दुधामध्ये साखर, मखाणे, ड्रायफ्रुटस घालून त्याची घट्टसर खीर बनवून घ्या. जेवणानंतर गोड डेझर्ट म्हणून तुम्ही ही मखाण्याची खीर खाऊ शकता. मखाण्याची खीर चवीला फार उत्तम लागते.

मखाण्याचे ७ प्रकार, पौष्टिक आणि चमचमीत चवीचे भन्नाट कॉम्बिनेशन, हिवाळा करा साजरा...

घरी लावलेल्या घट्टसर दह्यामध्ये मखाणे, लाल तिखट, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ घालून त्याच रायतं बनवू शकता. हे रायतं तुम्ही पराठे किंवा पुलाव भात, बिर्याणी सोबत खाऊ शकता.

मखाण्याचे ७ प्रकार, पौष्टिक आणि चमचमीत चवीचे भन्नाट कॉम्बिनेशन, हिवाळा करा साजरा...

तुमच्या आवडीनुसार डाळी भाजून त्याच बारीक पीठ करून घ्या. या पिठामध्ये ड्रायफ्रुटस, भाजलेले मखाणे बारीक चुरा करून घालावे. हे सगळे एकत्रित करून तुपात ५ ते ८ मिनिटे भाजून घ्या. पीठ थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून त्याचे गोल लाडू बनवून घ्या.

मखाण्याचे ७ प्रकार, पौष्टिक आणि चमचमीत चवीचे भन्नाट कॉम्बिनेशन, हिवाळा करा साजरा...

मखाणे भाजून त्यात चवीनुसार मीठ, मसाले घालून तव्यावर हलकेच परतून घ्या. हे मखाणे थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.

टॅग्स :अन्नfood