Join us

मिल्कशेकचे ७ प्रकार, समर है तो मिल्कशेक है! प्या गारेगार मिल्कशेक, मुलंही खुश आणि आईही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2025 18:14 IST

1 / 10
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे मनसोक्त गारेगार पेयांचा आस्वाद घ्यायचे दिवस. सोडा असो वा सरबत सगळंच आपण ताव मारून पितो.
2 / 10
असाच एक गारेगार पेयाचा प्रकार म्हणजे मिल्कशेक. हा प्रकार लोकांना फार आवडतो. उन्हाळ्यामध्ये तो गारवा तर देतोच पण पोटभरीचाही होतो. विविध फळांचा वापर करून अनेक प्रकारचे मिल्कशेक तयार करता येतात.
3 / 10
हे ७ मिल्कशेकचे प्रकार या उन्हाळ्यामध्ये जरूर प्या. नक्कीच आवडतील.
4 / 10
१. बनाना मिल्कशेक हे तयार करायला फारच सोपं आहे. तेवढंच रिफ्रेशिंगही आहे. पौष्टिक तयार करायचे असेल तर साखरेऐवजी खजूर वापरून बघा.
5 / 10
२. ओरीयो मिल्कशेक हे ज्यूस सेंटरवरील सर्वात जास्त मागणी असलेले मिल्कशेक आहे. ओरीयोची बिस्कीटे घरी आणून घरीही हे मिल्कशेक तयार करता येते.
6 / 10
३. वर्षानुवर्षे चिकू मिल्कशेक घरोघरी तयार केला जात आहे. तयार करायला अगदीच सोपा आणि चवीला एकदम भारी.
7 / 10
४. आता आंबे बाजारात यायला सुरवात झाली आहे. मग मॅन्गो मिल्कशेक तो बनताही है. घरी तयार केलेला तर अतिउत्तम.
8 / 10
५. सगळ्यात जास्त विक्री होते ती चॉकलेट मिल्कशेकची. चॉकलेट आवडणाऱ्यांसाठी तर हे मिल्कशेक बेस्ट आहे.
9 / 10
६. जरा महाग पण अत्यंत पौष्टिक असा शेक म्हणजे बदामशेक. जरा महाग पडतो पण त्यामध्ये अनेक पोषकसत्वेही असतात.
10 / 10
७. स्ट्रॉबेरी मिल्कशेक माहिती नाही असे नेमकेच कोणी असेल. एकदम चविष्ट आणि आंबट-गोड असे हे मिल्कशेक नक्कीच पिऊन बघा.
टॅग्स : समर स्पेशलअन्नदूधफळे