7 ways for giving tadka to your food, how to give tadka to food for making it more delicious
कुणी फोडणी घालतं कुणी तडका मारतं? पाहा देशभरातल्या भन्नाट फोडण्या- सांगा, तुम्हाला कोणती आवडते?Published:April 17, 2024 09:10 AM2024-04-17T09:10:43+5:302024-04-17T09:15:01+5:30Join usJoin usNext पदार्थांना फोडणी घालणं किंवा तडका देणं हे प्रत्येक स्वयंपाक घरात होणारं रोजचं काम. वरवर पाहायला गेलं तर हे काम अगदी साधं- साेपं वाटतं. पण ते ही किती वेगळ्या पद्धतीने करता येतं ते पाहा. गुजरातमध्ये जेव्हा एखाद्या पदार्थाला फोडणी घालतात, तेव्हा त्यात टोमॅटो आणि हिंग हे दोन पदार्थ आवर्जून घातले जातात. बंगाली पदार्थांना जो तडका दिला जातो त्याला बंगाली भाषेत Panchporan म्हणतात. तिथे फोडणी देण्यासाठी ५ पदार्थ आवर्जून वापरले जातात. ते म्हणजे बडिशेप, ओवा, मेथी दाणा, कलोंजी आणि मोहरी. बिहारी पदार्थांमध्ये फोडणीसाठी अख्ख्या लाल मिरच्या आणि लसूण घातला जातो. दक्षिण भारतात फोडणी करताना त्यात आवर्जून कडिपत्ता, उडीद डाळ, तूर डाळ टाकली जाते. बहुतांश पंजाबी पदार्थ करताना त्यात आलं-लसूण पेस्ट, जीरे, कांदा, टोमॅटो असं सगळं टाकलं जातं. काश्मिर भागातले मुगलाई पदार्थ करण्यासाठी जेव्हा फोडणी केली जाते, तेव्हा त्यामध्ये वेलची, दालचिनी, मीरे, तेजपान असे पदार्थ घातले जातात. तर महाराष्ट्रीयन पदार्थांच्या फोडणीमध्ये प्रामुख्याने मोहरी, जीरे, हिंग हे पदार्थ आढळून येतात. टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीCooking TipsRecipe