नासलेलं दूध फेकून देता? मग तुम्हाला माहितीच नाही नासलेल्या दुधाचे ८ उत्तम उपयोग, पाहा यादी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 5:53 PM 1 / 9दूध पुन्हा पुन्हा गरम करून अथवा फ्रीजमध्ये ठेवून बराच काळ टिकवता येतं. पण जर तुम्ही एखाद्या वेळी दूध गरम करायला विसरला अथवा फ्रीजमध्ये ठेवून द्यायला विसरलात तर बाहेरच्या हवामानामुळे ते खराब होत. दूध नासल्यावर पारदर्शक पाण्यासारखा पदार्थ तयार होतो. असं नासलेलं दूध बऱ्याच गृहिणी फेकून देतात कारण त्याचा वापर पिण्यासाठी अथवा चहासाठी करता येत नाही. असं असलं तरी नासलेलं दूध फेकण्याची मुळीच गरज नाही कारण त्याचा वापर करून तुम्ही निरनिराळे पदार्थ बनवू शकता. यासाठीच समजून घेऊयात नासलेल्या दुधापासून नक्की काय काय करता येऊ शकते(8 Benefits Of Sour Milk).2 / 9 नासलेल्या दुधापासून तुम्ही घरच्या घरी मस्त खवा बनवू शकता. नासलेल्या दुधातील संपूर्ण पाणी जोपर्यंत आटून जात नाही तोपर्यंत ते गरम करून घ्या. त्यानंतर घट्ट झालेल्या दूधात थोडी साखर मिसळा तुमचा खवा तयार आहे. हा खवा तुम्ही कोणत्याही मिठाईसाठी किंवा खव्याची पोळी बनवण्यासाठी वापरू शकता.3 / 9 नासलेल्या दुधाचे पनीर खूप चांगले बनू शकते. जर आपल्याला घरच्या घरी पनीर बनवून हवे असेल तर आपण दूध फाडून त्याचे पनीर बनवतो. दूध नासल्यावर त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्यावे. घट्ट झालेला पनीरचा भाग गाळून घेण्यासाठी एका मलमलच्या कापडात घालून मग पिळून घ्या आणि थोडावेळ टांगून ठेवा. अशाप्रकारे तुम्हाला तयार पनीर मिळेल. 4 / 9फाटलेले दूध तुम्ही तुमच्या एखाद्या भाजीची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी वापरू शकता. भाजी शिजल्यावर नासलेलं दूध शेवटी टाका आणि दोन ते तीन मिनीटे उकळून गॅस बंद करा. ज्यामुळे तुमच्या भाजीची ग्रेव्ही तर घट्ट होईलच शिवाय तुमच्या भाजीचा स्वादही वाढेल.5 / 9कणीक मळण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करण्याऐवजी नासलेले दूध वापरू शकता. ज्यामुळे तुमची कणीक अतिशय मऊसूत आणि स्वादिष्ट होईल. या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या जास्त चविष्ट आणि पौष्टिक होतील. 6 / 9फाटलेल्या दुधापासून सुंदर केक बनवू शकता. फाटलेले दूध घेऊन त्यात मैदा आणि बेकिंग सोडा घाला. त्यानंतर नॉर्मल केक जसा बनवितो तसं बेक्ड करून घ्या. यामुळे नासलेले दूध वायाही नाही जाणार आणि सुंदर केक पण बनवता येईल. 7 / 9फाटलेल्या दुधातून पाण्याचा अंश संपूर्ण काढून घ्या. जे घट्ट पनीर तयार मिळेल त्यात मसाले, मीठ आणि बारीक चिरलेला कांदा घालून पराठ्याचे स्टफिंग तयार करून घ्या. हे स्टफिंग वापरून तुम्ही पनीर पराठा बनवू शकता. 8 / 9नासलेल्या दुधापासून बर्फी बनवू शकता. या दुधातून संपूर्ण पाणी काढून घेतल्यावर त्यात खवा मिसळून घ्या. आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुटस घाला. त्यानंतर हे मिश्रण एका ट्रे मध्ये सेट करून बर्फीच्या आकाराचे तुकडे करून घ्या. 9 / 9भात शिजताना त्यामध्ये नासलेले दूध मिसळले तर त्यामुळे भाताची चव आणि पोषकतत्त्व वाढण्यास मदत होते. यासाठी नासलेले दूध गाळून घ्या आणि ते पाणी भात शिजवताना वापरा. तुम्ही हे पाणी भाताप्रमाणेच न्यूडल्स अथवा पास्ता बनवण्यासाठीदेखील वापरू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications