Join us   

तेलाचा एक थेंबही न वापरता करा ८ प्रकारचे सूप, थंडीत रोज प्या गरमागरम सूप-वजन करा कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2024 3:28 PM

1 / 10
हिवाळ्यात वातावरणात थंडावा (Winter Tips) जाणवतो. अशावेळी आपण गरमा-गरम पदार्थ खाण्यास प्राधान्य देतो. ज्यात सूपचा देखील समावेश आहे (Food). वाटीभर सूप प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात (Cooking Tips). यासह शरीर उबदार राहते (Weight Loss Diet). पण एकाच प्रकारचे सूप पिऊन आपल्याला साहजिक कंटाळा आला असेल(8 Best Indian Soup For Weight Loss).
2 / 10
जर आपण वेट लॉस करत असाल आणि सूपमध्ये व्हरायटी हवी असेल, तर 'या' ८ प्रकारचे सूप ट्राय करून पाहा. यामुळे आरोग्य तर सुदृढ राहील. यासह जिभेला नवीन चव मिळेल.
3 / 10
वेजिटेबल सूप आपण ट्राय केलं असेल, पण आता झिरो ऑईल वेजिटेबल सूप ट्राय करून पाहा. यात आपण भाज्यांचे प्रमाण जास्त ठेवू शकता. मुलांना हा सूपचा प्रकार नक्कीच आवडेल.
4 / 10
मूग डाळीचा वापर शक्यतो भाजी, वरण किंवा पराठ्यामध्ये होतो. आपण मूग डाळीचे पौष्टीक सूप देखील ट्राय करू शकता. त्यात आपण हिरव्या पालेभाज्याही घालू शकता.
5 / 10
कॉर्न सूप बहुतांश मुलांना आवडतो. यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. कॉर्न सूपमध्ये तेलाचा वापर न करता, त्यात इतर भाज्या घालू शकता.
6 / 10
मुलं आवडीने टोमॅटो सूपही पितात. आंबट - गोड चवीमुळे वयोवृद्ध लोकही टोमॅटो सूप आवडीने पितात. आपण टोमॅटो सूपमध्येही तेलाचा वापर टाळू शकता.
7 / 10
बीटरूट ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यातील पौष्टीक घटक रक्ताभिसरणाला चालना देतात. यासह या सूपमुळे त्वचाही तुकतुकीत दिसते.
8 / 10
हिरव्या मुगाचा सूपही वेट लॉससाठी मदत करू शकते. झिरो ऑईल मुगाचा सूप प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
9 / 10
झिरो ऑईल मसूर डाळीचे सूप वेट लॉससाठी मदत करते. यासह यातील पौष्टीक घटक डोळ्यांसाठी आणि हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करतील.
10 / 10
लहान मुलांना न्यूडल्स फार आवडतात. आपण न्यूडल्स सूपही तयार करू शकता. मुलांना मशरूम आवडत असतील तर, त्यात मशरूम घाला.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.थंडीत त्वचेची काळजीकिचन टिप्स