कडाक्याच्या थंडीत खा ८ पैकी १ पौष्टीक लाडू; हाडं होतील बळकट; केस - त्वचा आणि शरीरही राहील धडधाकट

Published:November 24, 2024 06:50 PM2024-11-24T18:50:52+5:302024-11-24T18:54:55+5:30

8 Laddoos to Eat for Healthy Bones and Good Health in Winter : ८ प्रकारचे लाडू खा अन् थंडी पळवा..

कडाक्याच्या थंडीत खा ८ पैकी १ पौष्टीक लाडू; हाडं होतील बळकट; केस - त्वचा आणि शरीरही राहील धडधाकट

हिवाळ्यात (Winter Care Tips) स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आहार महत्वाचा ठरतो. या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात भूक लागते (Health Tips). भुकेवर नियंत्रण (Hunger Control) मिळवण्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करायला हवा. या ऋतूमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींबाबत अत्यंत काळजी घ्यावी लागते. शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि सर्दी-खोकला यांसारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी विशेष पौष्टीक लाडू खायला हवे(8 Laddoos to Eat for Healthy Bones and Good Health in Winter).

कडाक्याच्या थंडीत खा ८ पैकी १ पौष्टीक लाडू; हाडं होतील बळकट; केस - त्वचा आणि शरीरही राहील धडधाकट

हिवाळ्यात १ पौष्टीक लाडू खाल्ल्याने आरोग्याला चालना मिळते. नियमित ८ पैकी १ लाडू खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. जर आपल्याला पौष्टीक आणि चवदार लाडू करायचं असेल तर, ८ पैकी १ लाडू खा. आरोग्याला मिळतील असंख्य फायदे.

कडाक्याच्या थंडीत खा ८ पैकी १ पौष्टीक लाडू; हाडं होतील बळकट; केस - त्वचा आणि शरीरही राहील धडधाकट

डिंक अनेक लाडवांमध्ये घातले जाते. डिंकाचे लाडूही केले जातात. यात कॅल्शियम, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट असतात. आपण डिंकाचे किंवा लाडूमध्ये डिंक घालू शकता.

कडाक्याच्या थंडीत खा ८ पैकी १ पौष्टीक लाडू; हाडं होतील बळकट; केस - त्वचा आणि शरीरही राहील धडधाकट

तीळ गुळाचे लाडू शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. हिवाळ्यात हे लाडू खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हाडे मजबूत होतात. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी नियमित तीळ गुळाचे लाडू खा.

कडाक्याच्या थंडीत खा ८ पैकी १ पौष्टीक लाडू; हाडं होतील बळकट; केस - त्वचा आणि शरीरही राहील धडधाकट

हिवाळ्यात गाजराचा हलवा खाल्ला जातो. पण यंदा गाजराचा लाडू बनवून खा. गाजर हे पौष्टीक्तेचे पॉवरहाऊस आहे. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. आपण त्यात ड्रायफ्रुट्सही घालू शकता. नियमित एक लाडू खाल्ल्याने नजर तीक्ष्ण होईल.

कडाक्याच्या थंडीत खा ८ पैकी १ पौष्टीक लाडू; हाडं होतील बळकट; केस - त्वचा आणि शरीरही राहील धडधाकट

अळशीच्या बिया खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे. यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपण त्यात शेंगदाणे, मखाणा देखील घालून खाऊ शकता. केस, त्वचासाठीही हे लाडू फायदेशीर ठरते.

कडाक्याच्या थंडीत खा ८ पैकी १ पौष्टीक लाडू; हाडं होतील बळकट; केस - त्वचा आणि शरीरही राहील धडधाकट

हिवाळ्यात सुका मेवा नियमितपणे खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हाडं मजबूत होतात. ड्रायफ्रुट्स लाडू बनवणे अगदी सोपे आहे. यात गुळ, साखर घालण्याऐवजी खजूर घाला. पौष्टीक लाडू तयार होतील.

कडाक्याच्या थंडीत खा ८ पैकी १ पौष्टीक लाडू; हाडं होतील बळकट; केस - त्वचा आणि शरीरही राहील धडधाकट

थंडीत मेथी दाणे खाल्ल्याने शरीर उबदार राहते. यातील पौष्टीक घटक केस, त्वचा आणि वेट लॉससाठीही मदत करते. लहान मुल मेथी दाण्याचे लाडू खाताना नाक मुरडतात. चविष्ट बनवण्यासाठी आपण त्यात गुळ घालू शकता. नियमित एक लाडू खाल्ल्याने हाडं बळकट होतात.

कडाक्याच्या थंडीत खा ८ पैकी १ पौष्टीक लाडू; हाडं होतील बळकट; केस - त्वचा आणि शरीरही राहील धडधाकट

तीळ हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवते. यासह हृदयाचे आरोग्यही सुधारते. त्यामुळे थंडीच्या दिवसात तिळाचे लाडू खा. यामुळे केस आणि त्वचेलाही फायदा होईल.

कडाक्याच्या थंडीत खा ८ पैकी १ पौष्टीक लाडू; हाडं होतील बळकट; केस - त्वचा आणि शरीरही राहील धडधाकट

सुकं खोबऱ्याचे लाडू हिवाळ्यात अवश्य खायला हवे. यात प्रोटिन्स, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हिवाळ्यात होणारे आजार दूर राहतात. आणि हाडांना बळकटी मिळते.