रणरणत्या उन्हाळ्यात 'हे' ९ पदार्थ ठेवतील सुपरकूल! मिळेल नैसर्गिक थंडावा - पोटाच्या समस्या राहतील दूर...
Updated:April 11, 2025 14:08 IST2025-04-11T13:50:14+5:302025-04-11T14:08:10+5:30
Add These Natural Coolers In Summer Diet To Boost Digestion : 9 foods and drinks to keep you cool, support digestion : 9 Foods You Must Have to Keep Cool During Summer : 9 Naturally Cooling Foods To Eat In Rotation This Summer : उन्हाळ्यात आर्टिफिशियल सरबत, कोल्डड्रिंक्स नको, मग आहारात हवेच असे नॅचरल कुलर्स...

दिवसेंदिवस उन्हाळा फार वाढतच जात आहे. अशा कडाक्याच्या उन्हांत (9 foods and drinks to keep you cool, support digestion) आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हायड्रेटेड राहणं आणि योग्य आहार घेणं फार महत्वाचं असतं. उन्हाळ्यात शरीर आतून थंड ठेवण्यासाठी आपल्याला वारंवार काहीतरी थंडगार खाण्यापिण्याची इच्छा होतेच.
अशावेळी आर्टिफिशियल कोल्डड्रिंक्स किंवा केमिकल्सयुक्त सरबत (9 Foods You Must Have to Keep Cool During Summer) पिणे आरोग्यला हानिकारक ठरु शकते. यासाठीच आहारात असे नैसर्गिक थंड पदार्थ समाविष्ट केले जे पाहिजेत जे फक्त शरीराला थंड करत नाहीत तर पोटाचे आरोग्य देखील सुधारतात, असे पदार्थ कोणते ते पाहूयात.
१. काकडी :-
काकडीमध्ये जवळजवळ ९५ % पाणी असते. ते शरीराला हायड्रेट करते आणि पोट फुगणे तसेच गॅसच्या समस्यांशी लढण्यास मदत करते. उन्हाळ्यात आपण काकडी सॅलेड किंवा स्मूदीच्या स्वरूपात खाऊ शकता. शरीर थंड ठेवण्यासाठी काकडी हा सर्वात उत्तम पदार्थ आहे.
२. दही :-
दह्यामध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात जे आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. उन्हाळ्यात आपण दही, रायता किंवा लस्सीच्या स्वरूपात घेऊ शकता. दही शरीराला आतून थंड करण्यास मदत करते.
३. पुदिना :-
पुदिन्यामध्ये मेन्थॉल असते जे पोटाला थंडावा देते. पुदिन्याची पाने बारीक चिरुन ताक, लिंबूपाण्यांत घालून पिऊ शकता. याचबरोबर पुदिन्याच्या पानांची चटणी करून देखील तुम्ही पुदिन्याचा आहारात समावेश करु शकता. पुदिन्याची पाने गॅस, ॲसिडिटी कमी करण्यास देखील मदत करते.
४. कलिंगड :-
कलिंगड केवळ हायड्रेशनच वाढवत नाही तर त्यातील हाय फायबर आणि पाण्याचे प्रमाण पोट हलके आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते सोबतच पोटाला थंडावा देखील मिळतो.
५. बेलचा रस :-
बेल फळामध्ये पचनसंस्थेला शांत करणारे गुणधर्म असतात. बेलाचे सरबत बद्धकोष्ठता, पोटदुखी यांसारख्या समस्यांमध्ये फायदेशीर ठरते. त्यात थंडावा देणारे घटक असतात जे उन्हाळ्यात शरीराचे तापमान संतुलित ठेवतात.
६. ताक :-
ताक उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवतेच, शिवाय पोटाची पचन प्रक्रिया सुधारण्यासही मदत करते. यामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारते. उन्हाळ्याच्या सिझनमध्ये, दिवसांतून एकदा मीठ, भाजलेले जिरे आणि पुदिना घातलेले ताक प्यायल्याने पोटात होणारी जळजळ आणि जडपणापासून आराम मिळतो.
७. लिंबू पाणी :-
लिंबू पाण्यात व्हिटॅमिन 'सी' आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे पोट स्वच्छ ठेवण्यास आणि उष्णतेपासून आराम देण्यास मदत करतात. लिंबाचा रस कोमट किंवा थंड पाण्यात मिसळून पिण्याने आपल्याला उन्हाळ्यात आराम मिळतो.
८. पपई :-
पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते जे पचनास खूप मदत करते. एवढंच नव्हे तर बद्धकोष्ठता, अपचन आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांमध्ये पपई खाणे अधिक फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात सकाळी किंवा संध्याकाळी पपई खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो.
९. मोसंबी :-
मोसंबी व्हिटॅमिन 'सी' आणि पाण्याने समृद्ध असते. मोसंबी खाल्ल्याने शरीर थंड होते आणि पचनक्रिया सुधारते. याचबरोबर, ॲसिडिटी आणि गॅसच्या समस्यांमध्ये आराम देते आणि यकृत देखील निरोगी ठेवते. उन्हाळ्यात मोसंबी मीठासोबत खाणे अधिक फायदेशीर ठरते.