ताक एक ग्लास, आरोग्य फर्स्टक्लास! वाचा ताक पिण्याचे ७ फायदे, उन्हाळ्यात ताक हवेच..
Updated:February 18, 2025 15:12 IST2025-02-17T20:11:40+5:302025-02-18T15:12:37+5:30
A glass of buttermilk, first-class health! Read 7 benefits of drinking buttermilk : रोज एक ग्लास ताक प्या. मिळतील कमालीचे फायदे.

आपल्याकडे दुपारच्या जेवणानंतर ताक प्यायची पद्धत आहे. पोटाला थंडावा मिळावा म्हणून आपण ते पितोच पण त्याचे इतरही फायदे असतात.
बरेचदा उपवास करणारे लोक ताक पितात. तसेच लहान मुलांना खेळून आल्यावर आपण ताक देतो.
ताक व दही या दोन्ही पदार्थांना आपण सारखंच समजतो. पण त्या दोन्हीत काही फरक असतात. त्यांचे गुणधर्मही वेगळे असतात.
ताकामुळे पचनक्रिया सुधारते. पोटाला थंडावा मिळतो. म्हणून जेवणानंतर ताक पिण्याची पद्धत आहे. पोटाच्या समस्या कमी होतात.
ताक प्यायल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. ताकात फॉस्फरस असते. तसेच खनिजे असतात.
महिलांसाठी ताक पिणे उत्तम. ताकामध्ये जीवनसत्त्व बी १२ असते. त्याची कमतरता महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
चेहर्यासाठी ताक चांगले. त्यामुळे त्वचेवरील डाग नाहीसे होतात. त्वचेचे आरोग्य सुधारते.
वजन कमी करण्यासाठी ताकाचा फायदा होतो. ताकामध्ये इतर उपयोगी सत्व असतात, मात्र फॅट्सचे प्रमाण फार कमी असते. ताकामुळे भूकही कमी होते.
पित्ताचा त्रास बऱ्याच जणांना असतो. ताक हे पित्तशामक आहे. गार ताक प्यायल्याने पित्त शांत होते.
शरीरातील उष्णताही ताकाने कमी होते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरोघरी ताक प्यायले जाते.