Join us

ताक एक ग्लास, आरोग्य फर्स्टक्लास! वाचा ताक पिण्याचे ७ फायदे, उन्हाळ्यात ताक हवेच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2025 15:12 IST

1 / 10
आपल्याकडे दुपारच्या जेवणानंतर ताक प्यायची पद्धत आहे. पोटाला थंडावा मिळावा म्हणून आपण ते पितोच पण त्याचे इतरही फायदे असतात.
2 / 10
बरेचदा उपवास करणारे लोक ताक पितात. तसेच लहान मुलांना खेळून आल्यावर आपण ताक देतो.
3 / 10
ताक व दही या दोन्ही पदार्थांना आपण सारखंच समजतो. पण त्या दोन्हीत काही फरक असतात. त्यांचे गुणधर्मही वेगळे असतात.
4 / 10
ताकामुळे पचनक्रिया सुधारते. पोटाला थंडावा मिळतो. म्हणून जेवणानंतर ताक पिण्याची पद्धत आहे. पोटाच्या समस्या कमी होतात.
5 / 10
ताक प्यायल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. ताकात फॉस्फरस असते. तसेच खनिजे असतात.
6 / 10
महिलांसाठी ताक पिणे उत्तम. ताकामध्ये जीवनसत्त्व बी १२ असते. त्याची कमतरता महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
7 / 10
चेहर्‍यासाठी ताक चांगले. त्यामुळे त्वचेवरील डाग नाहीसे होतात. त्वचेचे आरोग्य सुधारते.
8 / 10
वजन कमी करण्यासाठी ताकाचा फायदा होतो. ताकामध्ये इतर उपयोगी सत्व असतात, मात्र फॅट्सचे प्रमाण फार कमी असते. ताकामुळे भूकही कमी होते.
9 / 10
पित्ताचा त्रास बऱ्याच जणांना असतो. ताक हे पित्तशामक आहे. गार ताक प्यायल्याने पित्त शांत होते.
10 / 10
शरीरातील उष्णताही ताकाने कमी होते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरोघरी ताक प्यायले जाते.
टॅग्स : अन्नआरोग्यहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्समहिला