माठातल्या पाण्यात घाला 'हा' एक पदार्थ, पाणी छान सुगंधी व पौष्टिक होईल.. उन्हाळ्यासाठी खास उपाय
Updated:April 21, 2025 20:02 IST2025-04-21T19:57:41+5:302025-04-21T20:02:24+5:30
Add this ingredient to the water the water will be fragrant and nutritious : उन्हाळ्यामध्ये वाळा तर वापरलाच पाहिजे. भरपूर थंडावा देतो.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण छान माठातले पाणी पितो. तुम्हाला माहिती आहे का? माठातले पाणी पौष्टिक करता येते. फक्त एक पदार्थ वापरुन पाण्याचे गुणधर्म वाढवता येतात.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हे पाणी पिणे शरीरासाठी फारच फायद्याचे ठरेल. फार काही करावे लागत नाही. तसेच पाण्याची चवही मस्त लागते.
वाळा हा बारमाही गवताचा प्रकार आहे. वाळ्याचा सुगंध फार छान असतो. त्यामुळे वाळ्याचा वापर साबण तयार करताना तसेच शॉम्पू आणि इतरही ब्यूटी प्रॉडक्ट्स तयार करतानाही त्यामध्ये वाळा केला जातो.
पाण्यामध्ये फक्त वाळ्याची एक जुडी टाकायची. वाळा बाजारात सहज उपलब्ध आहे, सगळीकडे मिळतो. अगदी स्वस्त असतो. एकदा पाण्यामध्ये टाकला की मग किमान १५ दिवस तरी छान ताजा राहतो.
वाळ्यामध्ये अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. इतरही अनेक गुणधर्म वाळ्यामध्ये असतात. वाळा मुळात फार थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर वाळा वापरायलाच हवा.
पित्ताचा त्रास असणार्यांसाठी वाळा औषधी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर पित्ताचा त्रास फारच जास्त वाढतो. तसेच अनेकांना कफाचा त्रास असतो. कफ प्रवृत्ती व पित्त प्रवृती दोन्ही त्रासांवर वाळा फायदेशीर आहे.
मूत्रपिंडाचे त्रास कमी होतात. जर रोज मूत्रमार्गात काही अडथळे येत असतील तर वाळा फायदेशीर ठरतो. त्यामुळे वाळ्याचे पाणी पिणे पोटाच्या विकारांसाठी फार उपयुक्त ठरते.
वाळ्याचे सरबत केले जाते. वाळ्याचा वास आणि चव दोन्ही छान असल्याने हे सरबत मस्त चविष्ट लागते. तसेच पोटाला थंडावा या सरबतामुळे मिळतो. उन्हाळ्यामध्ये हे सरबत प्यायलाच पाहिजे.
उन्हाळ्यामध्ये घामोळ्यामुळे जीव हैराण होतो. त्वचा लाल होते. लहान फोडांमुळे खाज सुटते. वाळ्याचे पाणी घामोळ्यावर लावल्याने आराम मिळतो.