1 / 9उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण छान माठातले पाणी पितो. तुम्हाला माहिती आहे का? माठातले पाणी पौष्टिक करता येते. फक्त एक पदार्थ वापरुन पाण्याचे गुणधर्म वाढवता येतात. 2 / 9उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हे पाणी पिणे शरीरासाठी फारच फायद्याचे ठरेल. फार काही करावे लागत नाही. तसेच पाण्याची चवही मस्त लागते. 3 / 9वाळा हा बारमाही गवताचा प्रकार आहे. वाळ्याचा सुगंध फार छान असतो. त्यामुळे वाळ्याचा वापर साबण तयार करताना तसेच शॉम्पू आणि इतरही ब्यूटी प्रॉडक्ट्स तयार करतानाही त्यामध्ये वाळा केला जातो.4 / 9पाण्यामध्ये फक्त वाळ्याची एक जुडी टाकायची. वाळा बाजारात सहज उपलब्ध आहे, सगळीकडे मिळतो. अगदी स्वस्त असतो. एकदा पाण्यामध्ये टाकला की मग किमान १५ दिवस तरी छान ताजा राहतो.5 / 9वाळ्यामध्ये अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. इतरही अनेक गुणधर्म वाळ्यामध्ये असतात. वाळा मुळात फार थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर वाळा वापरायलाच हवा. 6 / 9पित्ताचा त्रास असणार्यांसाठी वाळा औषधी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर पित्ताचा त्रास फारच जास्त वाढतो. तसेच अनेकांना कफाचा त्रास असतो. कफ प्रवृत्ती व पित्त प्रवृती दोन्ही त्रासांवर वाळा फायदेशीर आहे.7 / 9मूत्रपिंडाचे त्रास कमी होतात. जर रोज मूत्रमार्गात काही अडथळे येत असतील तर वाळा फायदेशीर ठरतो. त्यामुळे वाळ्याचे पाणी पिणे पोटाच्या विकारांसाठी फार उपयुक्त ठरते. 8 / 9वाळ्याचे सरबत केले जाते. वाळ्याचा वास आणि चव दोन्ही छान असल्याने हे सरबत मस्त चविष्ट लागते. तसेच पोटाला थंडावा या सरबतामुळे मिळतो. उन्हाळ्यामध्ये हे सरबत प्यायलाच पाहिजे. 9 / 9उन्हाळ्यामध्ये घामोळ्यामुळे जीव हैराण होतो. त्वचा लाल होते. लहान फोडांमुळे खाज सुटते. वाळ्याचे पाणी घामोळ्यावर लावल्याने आराम मिळतो.