Anant Ambani Radhika Merchant wedding in Jamnagar Gujarat, Famous food abd dishes of Jamnagar
जामनगरची स्पेशालिटी असणारे ५ पदार्थ! बघा अनंत- राधिकाच्या लग्नात पाहुण्यांना त्याची मेजवानी मिळणार का?Published:March 2, 2024 03:32 PM2024-03-02T15:32:55+5:302024-03-02T15:39:38+5:30Join usJoin usNext अख्ख्या भारतात ज्या लग्नाची चर्चा सुरू आहे तो अंबानी परिवारातला शाही विवाह सोहळा गुजरातमधील जामनगर येथे होत आहे. भारतातले आणि जगभरातले दिग्गज लोक, बॉलीवूडचे सेलिब्रिटी अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यासाठी जामनगरला गेलेले आहेत. गुजरात हे तसं खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय हौशी असलेल्या लोकांचं राज्य. जामनगरही त्याला अपवाद नाहीच. जामनगरची खासियत असणारे काही पदार्थ भारतभर प्रसिद्ध आहेत. हे पदार्थ नेमके कोणते आणि ते पारंपरिक पदार्थ लग्नासाठी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना चाखायला मिळणार का, असा प्रश्न खवय्यांना पडला आहे. जामनगरचा सर्वाधिक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे कचोरी. इतरही अनेक ठिकाणच्या कचोरी प्रसिद्ध आहेत. पण जामनगरच्या कचोरीची बातच काही और आहे. जामनगरचे घुगरेही प्रसिद्ध आहेत. घुगरा हा एक गोड पदार्थ आहे. बाहेरून हा पदार्थ कुरकीत असतो आणि त्याच्या आत गूळ, खोबरं, दाणे किंवा सुकामेवा असं सारण भरलेलं असतं. भाजी कोन हा पदार्थ म्हणजे जामनगरचा प्रसिद्ध नाश्त्यासाठीचा पदार्थ आहे म्हणजे. यामध्ये वेगवेगळ्या भाज्या डिपफ्राय केल्या जातात आणि त्या फुलके किंवा पुरीसोबत खातात. जामनगरचा कटका ब्रेड हा पदार्थही खवय्यांची रसना तृप्ती करणारा आहे. हा पदार्थ म्हणजे पुरी पुर्णपणे चिंचेच्या पाण्यात भिजवली जाते. नंतर त्यावर उकडलेला बटाटा, कांदा, शेव, फरसाण, डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे असं सगळं टाकून ती सर्व्ह करतात. जामनगरला जाऊन दाबेली तर खायलाच पाहिजे. कारण ती ही जामनगरची स्पेशालिटी आहे. टॅग्स :अन्नगुजरातजामनगरअनंत अंबानीलग्नबॉलिवूडfoodGujaratjamnagar-pcanant ambanimarriagebollywood