बैलपोळ्याला असतो 'या' पदार्थांचा मान! बघा पोळ्याला होणारे पारंपारिक चवदार पदार्थ-सर्जाराजासाठी खास बेत

Published:September 2, 2024 12:58 PM2024-09-02T12:58:26+5:302024-09-02T19:00:48+5:30

बैलपोळ्याला असतो 'या' पदार्थांचा मान! बघा पोळ्याला होणारे पारंपारिक चवदार पदार्थ-सर्जाराजासाठी खास बेत

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. श्रावण अमावस्येला येणारा बैलपोळा कृषीप्रधान सण म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा सण अतिशय मोठा आणि महत्त्वाचा असतो. (bail pola 2024)

बैलपोळ्याला असतो 'या' पदार्थांचा मान! बघा पोळ्याला होणारे पारंपारिक चवदार पदार्थ-सर्जाराजासाठी खास बेत

पोळ्याच्या दोन दिवस आधीपासूनच खांदे मळणी करून बैलांचे कोडकौतुक सुरू होते आणि पोळ्याच्या दिवशी त्यांना वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा...(traditional maharashtrian food for pola)

बैलपोळ्याला असतो 'या' पदार्थांचा मान! बघा पोळ्याला होणारे पारंपारिक चवदार पदार्थ-सर्जाराजासाठी खास बेत

बैलपोळ्याच्या दिवशी सगळ्यात मोठा मान असतो तो पुरणपोळीचा. या दिवशी बैलांसाठी केली जाणारी पुरणपोळी आपल्या नेहमीच्या पुरणपोळ्यांपेक्षा थोडी वेगळी असते. कणकेचा उंडा मोठा आणि त्यात पुरण कमी अशा पद्धतीची कमी गोड पुरणपोळी भरपूर तूप घालून बैलांना खाऊ घातली जाते. (polyacha naivedya)

बैलपोळ्याला असतो 'या' पदार्थांचा मान! बघा पोळ्याला होणारे पारंपारिक चवदार पदार्थ-सर्जाराजासाठी खास बेत

मराठवाड्यात पुरणपोळीच्या जोडीला भरपूर मसाले घालून झणझणीत रश्शी केली जाते. अस्सल गावरान पद्धतीने पाटा-वरवंट्यावर मसाले वाटून तयार केलेल्या या झणझणीत, तर्रीदार रश्शीची मजा काही वेगळीच असते. यालाच काही ठिकाणी कटाची आमटी असंही म्हणतात. (main food of bail pola festival)

बैलपोळ्याला असतो 'या' पदार्थांचा मान! बघा पोळ्याला होणारे पारंपारिक चवदार पदार्थ-सर्जाराजासाठी खास बेत

तर्रीदार रश्शीमध्ये भजी कुस्करून खाण्याची परंपराही अनेक भागात आहे. पोळ्याच्या दिवशी पुरणपोळीपेक्षाही भात, रश्शी आणि त्यावर कुस्करलेली कांदा भजी अशा पदार्थांवर अनेकजण विशेष आवडीने ताव मारतात.

बैलपोळ्याला असतो 'या' पदार्थांचा मान! बघा पोळ्याला होणारे पारंपारिक चवदार पदार्थ-सर्जाराजासाठी खास बेत

पोळ्याच्या दिवशी विदर्भात काही ठिकाणी करंजी केली जाते. पुरणपोळी सोबतच करंजीचाही त्याभागात मोठा मान असतो

बैलपोळ्याला असतो 'या' पदार्थांचा मान! बघा पोळ्याला होणारे पारंपारिक चवदार पदार्थ-सर्जाराजासाठी खास बेत

महाराष्ट्राच्या काही भागात पाच भाज्या एकत्र करून मिक्स भाजी केली जाते. संक्रांतीच्या भोगीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या मिक्स भाजीपेक्षा आहे ही भाजी जरा वेगळी असते. थोडा खोबऱ्याचा कीस किंवा शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी केली जाते. यात प्रामुख्याने श्रावणात मिळणाऱ्या शेंगाप्रकारातल्या भाज्या जास्त प्रमाणात असतात.

बैलपोळ्याला असतो 'या' पदार्थांचा मान! बघा पोळ्याला होणारे पारंपारिक चवदार पदार्थ-सर्जाराजासाठी खास बेत

पोळ्याच्या दिवशी आईने मुलाला वाण देण्याची प्रथा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात दिसून येते. यामध्ये साटोरी किंवा सांजोरी या पारंपरिक गोड पदार्थाचे विशेष महत्त्व आहे.