कंटाळा येतो, वेळ नाही म्हणून एकदाच कणिक भिजवून फ्रिजमध्ये ठेवता? शिळ्या पोळ्या बऱ्या की.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2024 3:45 PM 1 / 9बाकीचा सगळा स्वयंपाक एकीकडे आणि कणिक भिजवून पोळ्या करणं एकीकडे. कारण कणिक भिजवून त्याच्या पोळ्या लाटत बसण्याचं काम अनेकींना खूप कंटाळवाणं आणि वेळखाऊ वाटतं. 2 / 9त्यामुळे हे काम सोपं करण्यासाठी मग काहीजणी सकाळ- संध्याकाळची कणिक एकदाच भिजवून टाकतात आणि मग जास्तीची कणिक फ्रिजमध्ये ठेवून देतात. ही कणिक बऱ्याचदा काळी पडते. पण तरी आपण तिच्या पोळ्या खातो.3 / 9पण अशा फ्रिजमध्ये भिजवून ठेवलेल्या कणकेपेक्षा शिळी पोळी किंवा चपाती खाणं कधीही चांगलं, असं सांगणारा व्हिडिओ doctorhomemaker या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. (How long can we eat leftover chapati/roti?)4 / 9यामध्ये असं सांगितलं आहे की फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचे गुणधर्म बदलत जातात आणि ती आरोग्यासाठी लाभादायी नसते. पण पोळ्या मात्र तुम्ही केल्यानंतर १२ तासांत खाऊ शकता. 5 / 9शिळ्या पोळीचा कुस्करा हा आपल्याकडचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. शिळ्या पोळ्या नेहमी दही किंवा ताकासोबत खाव्या. कारण त्यामुळे त्या अधिक पाचक होतात. शिळ्या पोळ्यांमधले अनेक कम्पाउंड बदलत जातात. त्यामुळे त्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात, ते फायदे नेमके कोणते पाहा...6 / 9शिळ्या पोळ्यांमधले स्टार्च कमी झालेले असतात आणि पचनासाठी चांगले असणारे बॅक्टेरिया त्यांच्यात वाढलेले असतात.7 / 9अशा पोळ्या खाल्ल्याने इन्सुलिन निर्मितीस अडथळा येत नाही. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठीही त्या उपयुक्त ठरतात.8 / 9तसेच व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर ती दूर करण्यासाठी शिळ्या पोळ्या अधिक फायदेशीर ठरतात, असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.9 / 9पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमीच शिळ्या पोळ्या खाव्या. कणिक फ्रिजमध्ये ठेवून नंतर तिच्या पोळ्या करण्यापेक्षा आधीच पोळ्या करून ठेवा आणि त्या १२ तासांच्या आत संपवा, असा त्यामागचा अर्थ आहे. १२ तासांपेक्षा जास्त शिळी पोळी खाऊ नये. आणखी वाचा Subscribe to Notifications