Join us   

Benefits of banana : रोज सकाळी फक्त १ केळी खा; शरीराला मिळतील 'हे' जबरदस्त फायदे; चांगल्या तब्येतीचा सोपा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 4:35 PM

1 / 7
आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात असे अनेक पदार्थ असतात ज्याचा शरीराला काहीही फायदा होत नाही. तर काही पदार्थ असेही असतात ज्यामुळे शरीराला चांगले फायदे मिळतात. (Banana eating benefits) केळी सगळेचजण आपापल्या आवडीनुसार घरी आणतात. काहीजण नियमित खातात तर काहींना समोर दिसलं तरी केळी खाण्याची इच्छा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केळी खाल्ल्यानं मिळणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांबाबत सांगणार आहोत. रोज सकाळी फक्त एक केळी खाल्ल्यानं तुमची तब्येत चांगली राहण्यास मदत होऊ शकते. (Benefits of banana)
2 / 7
जर तुम्ही 115 ग्रॅम केळींच सेवन केलं तर त्यातून तुम्हाला इतके पोषक तत्वे मिळतात. कार्बोहायड्रेट, 1 ग्रॅम प्रोटीन, 0.3 मिलीग्रॅम मॅग्नीज, 450 मिलीग्रॅम पोटॅशियम, 34 मिलीग्रॅम मॅग्नेशियम, 0.3 मिलीग्रॅम आयर्न, 0.1 मिलीग्रॅम रायबोफ्लेविन, 0.8 मिलीग्रॅम नियासिन, 81 इंटरनॅशनल यूनिट व्हिटॅमिन ए, 0.5 मिलीग्रॅम व्हिटॅमिन बी-6, 9 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी, 3 ग्रॅम डाइट्री फायबर, 25 मायक्रोग्रॅम फॉलेट असते
3 / 7
तणाव, डिप्रेशन झालं असेल तर केळीचं सेवन करा. एका शोधातून हे समोर आलं आहे की, केळी खाल्ल्याने तणाव आणि डिप्रेशनपासून सुटका मिळते. कारण केळींमध्ये प्रोटीन आणि अनेक अॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात जे डोकं शांत करतात.
4 / 7
केळीचं सेवन नियमितपणे केल्याने ब्लड प्रेशर सामान्य राहतं. यात पोटॅशिअम आढळतं जे ब्लड प्रेशरमुळे होणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका कमी करतात. तसेच याने हायपरटेंशनची समस्याही नियंत्रित राहते.
5 / 7
केळी हृदय रोगाने ग्रस्त लोकांसाठी फार फायदेशीर असतात. नियमित केळी खाल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो. या कारणाने केळी खाल्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी होते. तसेच यात आयर्न भरपूर प्रमाणात असतं, ज्या कारणाने रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. दररोज दोन केळी खाणाऱ्यांना हृदय रोग आणि पचनक्रियेसंबंधी समस्या होत नाही.
6 / 7
आयुर्वेदानुसार, ब्रेकफास्ट केल्यानंतर केळी खाणं फायदेशीर ठरतं. केळी खाण्याची योग्य वेळ सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंतची आहे. पण लक्षात ठेवा. नाश्ता केल्यानंतरच केळी खाणं फायदेशीर ठरतं. आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्यापोटी फळं खाणं शक्यतो टाळावं.
7 / 7
सकाळी अनोशापोटी केळी खाल्याने भूक मरते. हे शरीरासाठी फायदेशीर ठरत नाही. अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी केळी खातात. शक्यतो असं करणंही टाळावं. कारण रात्री केळी खाल्याने तुम्ही आजारी पडू शकता. रात्री केळी खाल्याने खोकल्याची समस्या होऊ शकते.
टॅग्स : अन्नपाककृतीआरोग्यहेल्थ टिप्स