benefits of eating pumpkin, weight loss tips using pumpkin, health benefits of pumpkin
गौरींच्या नैवेद्यात लाल भोपळ्याचे एवढे महत्त्व का? ६ फायदे- आरोग्यासोबतच घेतो सौंदर्याचीही काळजीPublished:September 12, 2024 01:46 PM2024-09-12T13:46:23+5:302024-09-12T13:58:19+5:30Join usJoin usNext आपल्याकडच्या सणावारांमधून खाद्यसंस्कृती खूप छान जोपासली जाते. प्रत्येक सणावाराला वेगवेगळ्या पदार्थाचे महत्त्व असते. हे पदार्थ बहुतांश वेळा तो सण कोणत्या ऋतूमध्ये येतो त्यावर अवलंबून असते. महालक्ष्मीच्या किंवा गौरींच्या सणात लाल भोपळ्याचे खूप महत्त्व आहे. लाल भोपळ्याची भाजी गौरींच्या नैवेद्याला आवर्जून केली जाते. काही ठिकाणी तर लाल भोपळा दोन महालक्ष्मींच्यामध्ये आवर्जून ठेवला जातो आणि नंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. लाल भोपळ्याचे पदार्थ आहारात वाढवा, असा एकप्रकारे संदेशच या माध्यमातून दिला जातो. लाल भोपळा डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे. कारण त्यामध्ये विटामिन ए भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे तो लहान मुलांनाही खाऊ घालायला हवा. या दिवसात संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढलेले असते. लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे तो रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो. लाल भोपळ्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात. या दिवसात वातावरण थंड असते. त्यामुळे दमा, अस्थमा असा त्रास बऱ्याच जणांना होतो. हा त्रास कमी करण्याचे गुणधर्मही लाल भोपळ्यामध्ये आहेत. लाल भोपळ्यामध्ये कॅलरीज खूप जास्त असतात आणि फॅट्सचे प्रमाण बरेच कमी असते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या लोकांसाठीही लाल भोपळ्याचे वेगवेगळे पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. लाल भोपळ्यामध्ये विटामिन ई चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे तो केसांसाठी आणि त्वचेसाठीही उपयुक्त ठरतो.टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्सडोळ्यांची निगात्वचेची काळजीकेसांची काळजीfoodHealthHealth Tipseye care tipsSkin Care TipsHair Care Tips