best 5 winter special soup, easy and simple soup recipe, best soup for winter
रात्री गारेगार थंडीत प्या गरमागरम सूप! हिवाळ्यात ताकद देणारे ५ सूप, पाहा रेसिपी-उबदार आणि चविष्टPublished:November 16, 2024 02:33 PM2024-11-16T14:33:13+5:302024-11-16T15:36:39+5:30Join usJoin usNext हिवाळ्यात थंडीचा कडाका वाढला की रात्रीच्या जेवणात गरमागरम सूप प्यावंसं वाटतं. सूप करणं हे अजिबातच अवघड काम नाही. अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने चवदार सूप कसं करायचं ते पाहा.. १. गाजराचं सूप हिवाळ्यात गाजर मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे गाजराचं सूप नक्की करून प्या. गाजराचं सूप करताना त्यात थोडं आलं टाका. गाजर उकडून घ्या. नंतर ते थोडं आलं टाकून मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर ते गाळून घ्या आणि त्यात हवं तेवढं पाणी टाकून इतर मसाले टाकून कळून घ्या. २. पालक सूप हिवाळ्यात पालेभाज्या खूप फ्रेश मिळतात. त्यामुळे पालक भाजी, पालक पराठे, पालक पुरी यापेक्षा हिवाळ्यात पालक सूप करण्यास प्राधान्य द्या. पालकाच्या सूपमध्ये बटाटा, टोमॅटो आणि लसूण टाका. सूप जास्त चवदार होईल. ३. स्वीटकॉर्न - मुळा सूप स्वीटकॉर्न आणि मुळा हे दोन्ही एकत्र उकडून केलेलं सूप खूप चवदार लागतं. हे सूप करताना त्यात थोडा लसूण आणि आलं मात्र अवश्य घाला. तसेच थोडं लिंबू पिळून ते सूप प्या. ४. पत्ताकोबीचं सूप सर्दी झाली असल्यास पत्ताकोबीचं सूप पिणं उत्तम मानलं जातं. त्यामुळे हिवाळ्यात हे सूप नियमितपणे प्यायला हवं. पत्ताकोबीचं सूप करताना त्यात थोडी फुलकोबी आणि लसूण घाला. ५. मुगाच्या डाळीचं सूप मुगाच्या डाळीचं सूपही अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकं असतं. हिवाळ्यात थोड्याशा भाज्या घालून मुगाच्या डाळीचं सूप प्यावं. त्यात थोडा लसूण आणि आलंही आठवणीने घाला. टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.foodRecipeCooking Tips