शेफ कुणाल कपूर यांचा खास सल्ला, भेंडी विकत घेताना आणि भाजी करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 5:32 PM 1 / 9एरवी भेंडी घेताना या लहान- सहान गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. आपण सरळ भेंडी उचलतो आणि घरी घेऊन येतो. मग घरी आल्यावर भाजी करताना लक्षात येतं की त्यातल्या काही भेंड्या शिळ्या आहेत तर काही किडक्या आहेत. काही भेंड्या तर खूपच करकरीत असतात, अजिबात चिरल्या जात नाहीत. 2 / 9म्हणूनच तर घेतलेली भेंडी वाया जाऊ नये, तिची निवड योग्य व्हावी आणि शिवाय भेंडीची भाजीही चवदार लागावी, यासाठी प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी या काही खास टिप्स सांगितल्या आहेत. 3 / 9१. ज्या भेंडीचा रंग चमकदार हिरवा असेल ती भेंडी विकत घ्यावी. काळपट हिरवा रंग असणारी भेंडी घेऊ नका.4 / 9२. भेंडी खरेदी करताना तिचे शेवटचे टोक अंगठ्याने थोडेसे वाकवून पहा. ते लगेच तुटले तर ती भेंडी घ्यावी. हलक्या हाताने टोक तुटत नसेल, तर ती भेंडी शिळी आहे, असे समजावे. जी भेंडी खूपच मऊ असते अशी भेंडी तर खूपच जास्त शिळी असते. 5 / 9३. भेंडीची भाजी करताना तिचे काही तुकडे पटकन शिजतात तर काही शिजायला वेळ लागतो. त्यामुळे जर सगळे तुकडे एकदम शिजावेत असं वाटत असेल तर सगळ्या भेंड्या एकसारख्या मध्यम आकाराच्या घ्याव्यात.6 / 9४. खूप मोठी किंवा खूप छोटी भेंडी घेणे टाळावे. मध्यम आकाराच्या भेंड्या उत्तम असतात.7 / 9५. ज्या भेंडीचा आकार गोलाकार किंवा अर्धगोलाकार असतो ती भेंडी घेऊ नये.8 / 9६. ज्या भेंडीला काटे असल्यासारखं जाणवेल आणि जी भेंडी दिसायला ओबडधोबड असेल, अशी भेंडीही घेऊ नये. 9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications