Join us   

वरणाला अप्रतिम चव येण्यासाठी मीठ अन् हळद कधी घालायचं? ३ ट्रिक्स; वरण होईल मस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 12:18 PM

1 / 8
भारतीय जेवणात भात आणि डाळींना खूप महत्व आहे. रुचकर चवीशिवाय याचे अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. प्रत्येक घरामध्ये रोज डाळ बनवली जाते. डाळ बनवण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या असतात. बऱ्याच महिलांची तक्रार असते की वरणात हळद घालूनही परफेक्ट रंग येत नाही. यामागे डाळ आणि मीठ घालण्याचं टायमिंगसुद्धा तितकंच महत्वाचं असतं. काही महिला कुकरला डाळ लावनात मीठ आणि हळज घालतात. असं केल्यानं व्यवस्थित रंग येत नाही. ( What is the right time to add turmeric and salt to dal)
2 / 8
डाळ बनवण्यापूर्वी डाळ 15 मिनिटे धुवा आणि पाण्यात भिजत ठेवा. यानंतर कुकरमध्ये घाला आणि दुप्पट पाणी घाला, आता त्यात मीठ, हळद आणि अर्धा चमचा तेल टाकून विलंब न करता मंद आचेवर शिजवा. एका शिट्टीनंतर गॅस बंद करा. कुकरमधून आपोआप प्रेशर सुटल्यावरच प्रेशर कुकर उघडा. अनेक स्त्रिया लसूण आणि टोमॅटो एकत्र ठेवतात, पण असे केल्याने चव बरोबर येत नाही. (How to make perfect dal)
3 / 8
कुकरमध्ये डाळ लवकर शिजत नाही अशी महिलांची तक्रार असते. यामागे अनेक कारणे असू शकतात. अनेकदा कुकरच्या सैल रबरमुळे कुकरच्या आत योग्य दाब तयार होत नाही. यामुळे डाळी नीट शिजत नाहीत, अशावेळी डाळ बनवण्यापूर्वी कुकरचे रबर एकदा तपासून पाहा.
4 / 8
कुकरची शिटी खराब झाली तरी डाळ नीट न शिजण्याची समस्या उद्भवू शकते. अनेक डाळ शिजायला वेळ लागतो, त्यामुळे ती डाळ तयार करण्यापूर्वी सुमारे एक तास आधी पाण्यात भिजवावी.
5 / 8
जेव्हा कुकरमध्ये जास्त डाळ असेल तेव्हा कुकरमधून पाणी येते.
6 / 8
कुकरमध्ये भरपूर पाणी असतानाही ते झाकणाच्या आजूबाजूनं किंवा शिट्टीतून बाहेर येते.
7 / 8
लहान कुकरसाठी मोठा गॅस बर्नर वापरला तरी डाळ बाहेर येण्याची शक्यता असते.
8 / 8
म्हणूनच पाणी घातलाना डाळीचं प्रमाण लक्षात घ्या.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न