Join us   

Cooking Tricks : कढईत भाज्या करताना ३ ट्रिक्स वापरा; साधा स्वयंपाकही बनेल रुचकर, चवदार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 1:49 PM

1 / 7
स्वयंपाकघरात काही भांडी अशी असतात ज्यात आपण काहीतरी खास स्वयंपाकच बनवतो. जसं की भाज्या बनवण्यासाठी कढईचा वापर केला जातो. (Cooking Tips) तर काहीजण स्वयंपाकाचा वेळ वाचवण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये भाज्या शिजवतात. कुकरमध्ये भाज्या बनवणं खूपच सोप्पं आहे. पण कढईत बनवलेल्या आणि कुकरमध्ये शिजवलेल्या भाजीच्या चवीत बराच फरक असतो. (How to cook vegetables easily in kadhai)
2 / 7
ज्यावेळी प्रेशर कुकर खराब होतो किंवा शिट्ट्या व्यवस्थित होत नाहीत तेव्हा भाजी करण्यासाठी कढईचा वापर करावा लागतो. कढईत भाजी कितीवेळ शिजवावी, पाणी किती प्रमाणात घालावं याचा अंदाज नसल्यानं भाजीची चव बिघडू शकते आणि गॅससुद्धा वाया जातो. कढई रसम, टॉमॅटो किंवा चिंचासारख्या आंबट पदार्थांपासून बनवलेली भाजी तयारर करू नये.
3 / 7
जर तुम्हाला भाजी लवकर तयार करायची असेल आणि गॅस वाचवायचा असेल तर तुम्ही कढईवर झाकण ठेवूनच भाजी शिजवा. असं केल्यानं वाफ बाहेर येत नाही आणि जेवण व्यवस्थित शिजतं. कढईवर व्यवस्थित पदार्थ झाकला जाईल असं झाकण किंवा ताट ठेवून कमी आचेवर भाजी शिजू द्या. जेवण तयार झाल्यानंतर ५ मिनिटांनी झाकण उघडून भाजी सर्व्ह करा.
4 / 7
काही भाज्या शिजायला खूप वेळ लागतो जसं की मटार, वांगी, चवळी. म्हणून काही देठ असलेल्या भाज्या थोडावेळ मिठाच्या पाण्यात भिजवल्यानंतर शिजवा.
5 / 7
१) नेहमी लोखंडाच्या कढईत अन्न शिजवू नका. किमान दोन ते तीन दिवसांच्या अंतरानं लोखंडाची कढई वापरा
6 / 7
२) लोखंडी पॅन स्वच्छ करण्यासाठी जास्त स्ट्रॉंग द्रवपदार्थ वापरू नका
7 / 7
३) लोखंडी तवा धुतल्यानंतर लगेचच पुसून घ्या जास्तवेळ ओलसर राहू देऊ नका.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नपाककृती