Join us   

Diwali 2022 : शंकरपाळे कडक झाले? ५ टिप्स, शंकरपाळे होतील खुससुशीत खमंग आणि मस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 12:47 PM

1 / 8
सगळ्याच्यांच घरी सध्या दिवाळीचा फराळ (Diwali 2022) बनवण्याची लगबग सुरू आहे. कोणाला गोड तर कोणाला खारट शंकरपाळे खूप आवडतात. (Diwali faral recipe) तर काहीजण चहाबरोबर गोड शंकरपाळ्यांचा आस्वाद घेतात.
2 / 8
फराळाचे पदार्थ करताना भरपूर तेल, तूप, वेगवेगळी पीठं वापरली जातात अशावेळी बनवलेले पदार्थ वाया जाऊ नयेत म्हणून परफेक्ट फराळ जमणं फार महत्वाचं असतं. (Diwali 2022 Shankarpali recipe how make perfect sweet or salty shankarpali diwali)
3 / 8
अन्यथा कोणीही फराळ खायला मागत नाही. (How to make perfect shankarpali) शंकरपाळी मऊ, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरळतील अशा बनवण्याच्या असतील तर काही सोप्या ट्रिक्स लक्षात घ्यायला हव्यात.
4 / 8
१) शंकरपाळी खुसखुशीत करण्यासाठी पीठात मैद्याचं मोहन घाला.
5 / 8
२) शंकरपाळींमध्ये तुम्ही मैद्यासह रवाही घाऊ शकता. रव्यामुळे शंकपाळी लालसर होतील आणि चवही मस्त लागेल.
6 / 8
३) शंकरपाळी कापताना हळूवारपणे आणि समान आकारात कापा. हे काप एकत्र ठेवू नका. अन्यथा ते एकमेकांना चिकटू शकतात.
7 / 8
४) खारे शंकरपाळी करताना त्यात काळं मीठ वापरा. तुम्ही आवडीनुसार त्यात कस्तुरी मेथी घालू शकता.
8 / 8
५) गोड शंकरपाळींमध्ये आपण बारीक साखर आणि तुप, वाटल्यास वेलची पूड याचा वापर करा. दूध किंवा पाणी न घातल्यास किंवा कमी घातलं तरच शंकरपाळ्या मऊ आणि खुसखुशीत होतात. जर तुम्ही मैद्याच्या शंकरपाळ्या बनवत असाल तर त्यात पाणी वापरू नका.
टॅग्स : दिवाळी 2022कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न