लक्ष्मीपूजन-पाडवा-भाऊबीजेला घरी पाहुणे येणार? जेवणाचे ५ मेन्यू; जेवण होईल एकदम खास...

Published:October 23, 2022 05:25 PM2022-10-23T17:25:17+5:302022-10-23T18:10:40+5:30

Diwali Celebration Lunch Dinner Menu Ideas for Guests : कमीत कमी वेळात आणि कष्टात काय करावं हे कळत नसेल तर घ्या काही सोपे पर्याय.

लक्ष्मीपूजन-पाडवा-भाऊबीजेला घरी पाहुणे येणार? जेवणाचे ५ मेन्यू; जेवण होईल एकदम खास...

दिवाळी म्हटली की एकमेकांना भेटणे आणि जेवणाचे बेत आखणे ओघानेच आले. अशावेळी घरी पाहुणे येणार तर बेत काय करायचा असा प्रश्न तमाम महिला वर्गापुढे पडलेला असतो. ऐनवेळी कमीत कमी वेळात आणि कष्टात काय करावं हे कळत नसेल तर घ्या काही सोपे पर्याय. जेणेकरुन तुमची दिवाळी होईल एकदम मेमोरेबल (Diwali Celebration Lunch Dinner Menu Ideas for Guests).

लक्ष्मीपूजन-पाडवा-भाऊबीजेला घरी पाहुणे येणार? जेवणाचे ५ मेन्यू; जेवण होईल एकदम खास...

दिवाळीमुळे गोड खाऊन कंटाळा आला असेल तर छोले-भटुरे किंवा छोले पुरी हा उत्तम पर्याय आहे. छोले करायला सोपे, प्रोटीन्सचा खजिना असलेला पदार्थ आहे. थोडेसे मसालेदार छोले करणेही फार अवघड नसल्याने झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा हा मेन्यू नक्की करु शकता.

लक्ष्मीपूजन-पाडवा-भाऊबीजेला घरी पाहुणे येणार? जेवणाचे ५ मेन्यू; जेवण होईल एकदम खास...

मिसळ ब्रेड हा चमचमीत आणि सगळ्यांच्या आवडीचा आणि पोटभरीचा असा प्रकार. दिवाळीच्या दरम्यान घरात शेव, चिव़डा हमखास असल्याने यासाठी फारशी तयारी करावी लागत नाही. तसेच मिसळीसोबत सलाड आणि ताक असेल तरी जेवणासाठी हा उत्तम मेन्यू होऊ शकतो.

लक्ष्मीपूजन-पाडवा-भाऊबीजेला घरी पाहुणे येणार? जेवणाचे ५ मेन्यू; जेवण होईल एकदम खास...

पोळी-भाजी आणि साईड डीश, भात असे सगळे जेवण करण्यापेक्षा मिक्स व्हेज, पनीर किंवा बटाट्याचे पराठे हा जेवणासाठी एक झटपट होणारा पर्याय ठरु शकतो. मग या पराठ्यासोबत बटर, दही, सॉस, लोणचं असं काहीही असलं तरी चालतं. यासोबत दहीभात केला किंवा वरण भाताचा कुकर लावला तरी काम होते.

लक्ष्मीपूजन-पाडवा-भाऊबीजेला घरी पाहुणे येणार? जेवणाचे ५ मेन्यू; जेवण होईल एकदम खास...

दिवाळीत सतत गोड आणि तळकट खाऊन कंटाळा येण्याची शक्यता असते. यातच तुमच्याकडे लहान मुले आणि तरुणांची संख्या जास्त असेल तर त्यांना आवडेल असा चाटचा प्रकार करता येऊ शकतो. रगडा पॅटीस पोटभरीचे होत असल्याने रात्रीच्या वेळी पाहुणे घरी येणार असले तर हा छान पर्याय आहे.

लक्ष्मीपूजन-पाडवा-भाऊबीजेला घरी पाहुणे येणार? जेवणाचे ५ मेन्यू; जेवण होईल एकदम खास...

मसालेभात हा तर बहुतांश जणांच्या आवडीचा. यामध्ये घरात असतील त्या भाज्या घालून गरमागरम भात दिला की बाकी काही नसेल तरी चालते. यासोबत पापड, मठ्ठा, जिलेबी एखादी कोशिंबीर केली तरी शॉर्ट आणि स्वीट असा मेन्यू होऊ शकतो.