Join us

'या'५ फळांमुळे उन्हाळ्यात होतो अधिक त्रास, पोटदुखीसह आम्ल-पित्तही वाढते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2025 19:05 IST

1 / 8
उन्हाळ्यात बाजारात आपल्याला अनेक रंगबेरंगी फेळे पाहायला मिळतात. फळात असणारे घटक हे शरीराला योग्य पोषण देतात. या फळांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे डिहायड्रेशनच्या समस्येपासून आपली मदत होते. (Overeating fruits and digestive issues)
2 / 8
उन्हाळ्यात ही फळे खाल्ल्याने आरोग्याला जितका फायदा होतो तितकेच नुकसान देखील होते. या ऋतुमध्ये काही फळे अशी आहेत ज्यांचे जास्त सेवन केल्याने आपल्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होते. (Fruits that cause gut health problems)
3 / 8
उन्हाळ्यात तोंडाला चव येण्यासाठी लिची हे फळ फायदेशीर मानले जाते. परंतु, जास्त प्रमाणात याचे सेवन केल्याने पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
4 / 8
अननस जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात आम्लता आणि जळजळ होण्याची समस्या वाढते.
5 / 8
कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचे स्त्रोत आहे. यामुळे डिहायड्रेशनच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते. हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान होते. तसेच रक्तातील साखरेची पातळी देखील वाढवू शकते.
6 / 8
उन्हाळ्यात खरबूज शरीराला थंडावा देत नाही तर जिभेला चव देखील आणते. यामुळे आपण अधिक प्रमाणात खातो. ज्यामुळे पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्या वाढतात.
7 / 8
उन्हाळा म्हटलं की, आपण आंबे आवडीने खातो. परंतु आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला हानिकारक ठरतो. जर आपण मधुमेहाचे रुग्ण असू तर हा कमी प्रमाणात खायला हवा. आंब्यामध्ये जास्त प्रमाणात साखर आणि कार्बोहायड्रेट्स असल्याने साखरेची पातळी वाढू शकते.
8 / 8
पपई खाल्ल्याने पचनसंस्था सुरळीत होते पण उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाऊ नका. पपई उष्ण असल्यामुळे शरीरातील उष्णता वाढवते. ज्यामुळे अतिसाराची समस्या उद्भवते.
टॅग्स : अन्नआरोग्यफळे