चुकूनही ५ पदार्थ मिक्सरमध्ये वाटू नका, मिक्सर कधी भंगार होईल कळणारही नाही! ब्लेड होतील खराब Published:May 23, 2024 09:32 AM 2024-05-23T09:32:23+5:30 2024-05-23T15:03:38+5:30
Do Not Put These 5 Things In The Blender : एवाकॅडो, एप्रोकोट यांसारख्या मोठ्या बिया असलेल्या गोष्टी ब्लेंडमध्ये घालू नका. असं केल्याने फळांच्या बिया ब्लेडमध्ये अडकतात. मिक्सरचं भांड रोजच्या स्वंयपाकासाठी नियमित वापरले जाते. वाटण तयार करण्यापासून कोणताही डाळ दळण, सूप बनवणं या सर्व गोष्टींची साठी मिक्सरची आवश्यकता असते. ( Do Not Put These 5 Things In The Blender Or Mixer Even By Mistakes)
मिक्सरच्या भांड्यात साहित्य व्यवस्थित दळलं जावं यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचे असते. चुकीच्या पद्धतीने मिक्सर वापरल्यास ब्लेड्स लवकर खऱाब होतात आणि मिक्सर वापरण्यायोग्य राहत नाही. असे कोणते पदार्थ आहेत जे मिक्सरमध्ये वाटणं टाळायला हवं ते पाहूया.
हॉट लिक्विड
ब्लेंडरमध्ये कधीच हॉट लिक्विड घालण्याची चूक करू नका. कारण गरम पदार्थ वाफ तयार करतात. ज्यामुळे ब्लेंडरमध्ये दबाव येतो. मिक्सर सुरू केल्यानंतर त्याच झाकण फाटण्याची शक्यता असते. म्हणून निष्काळजीपणा करू नका.
फ्रोजन पदार्थ
ग्राईंडर किंवा ब्लेंडरमध्ये सम्दू बनवण्यासाठी बेरीज बदाम असे पदार्थ मिक्सरमध्ये घातले जाता. यामुळे मिक्सरचा ब्लेड तुटू शकतो. जास्त फ्रोजन आयटम्समुळे मिक्सर खराब होते. म्हणून हे फुड्स जास्त वाटू नका.
स्टार्चयुक्त भाज्या
बटाट्याबरोबरच इतर स्टार्चयुक्त भाज्या मिक्सरमध्ये बारीक करू नका. ब्लेड वेगाने फिरल्यामुळे अधिक स्टार्च तयार होते. ज्यामुळे तुम्हाला मनासारखा रिजल्ट दिसणार नाही.
बियावाली फळं आणि ड्राय फ्रुट्स
एवाकॅडो, एप्रोकोट यांसारख्या मोठ्या बिया असलेल्या गोष्टी ब्लेंडमध्ये घालू नका. असं केल्याने फळांच्या बिया ब्लेडमध्ये अडकतात.
कार्बोनेडेट ड्रिंक्स
कार्बोनेडेट ड्रिंक्स मिक्स केल्यानंतर ब्लेंडरमध्ये दबाव तयार होतो. जास्त प्रेशरमुळे विस्फोट होऊ शकतो. म्हणून कधीच कार्बोनेडेट ड्रिंक्स ब्लेंडर किंवा ग्राईंडरमध्ये घालण्याची चूक करू नका.