1 / 8कांदा आपल्या आहारातला एक महत्त्वाचा भाग आहे. वाटण असो की फोडणी असो. त्यात कांदा हवाच. भाजी आणि आमटीतही कांदा घातला जातो. पण अनेकदा माहितीच नसते की कांदा किती गुणकारी आहे.2 / 8कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात. जीवनसत्त्व 'ए' जीवनसत्त्व 'बी' कांद्यामध्ये असते. तसेच कांद्यामध्ये फायबर असतात. अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. इतरही अनेक पोषकतत्वे असतात.3 / 8शरीरासाठी कांदा फायदेशीर ठरतो. हृदयाच्या आरोग्यासाठीही कांदा चांगला असतो. कांद्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच कांदा अनेकदृष्या फायदेशीर असतो. 4 / 8कांदा पचनासाठी फार चांगला असतो. फायबरचे प्रमाण कांद्यामध्ये भरपूर असते. त्यामुळे पचन प्रक्रियेसाठी कांदा फायद्याचा ठरतो.5 / 8कांद्यामध्ये क्रोमियम असते. क्रोमियममुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणार्यांसाठी कांदा चांगला.6 / 8त्वचेसाठी कांदा गुणकारी असतो. कांद्यातील अँण्टी ऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात.7 / 8ओनियन शाम्पू हा प्रकार सध्या फार लोकप्रिय आहे. केसांचे गळणे कांद्याच्या वापरामुळे थांबते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी कांदा वापरा. 8 / 8उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हामुळे फिट येणारे लोक खिशात कांदा घेऊन फिरतात. कारण कांद्यामध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात. कांद्याच्या वासानेही शुद्ध येते.