महागडे ड्रायफ्रुट्स खराब होऊ नयेत म्हणून करा ८ गोष्टी, कुबट वास येणार नाही...

Published:November 15, 2024 05:26 PM2024-11-15T17:26:29+5:302024-11-15T17:39:43+5:30

Easy Storage Tips : How To Store Dried fruits (Nuts) For Long Time : How to store dry fruits and nuts for maximum freshness : There Are A Few Things You Should Know Before Storing Dry Fruits : ड्रायफ्रुटस सादळून मऊ पडतात किंवा खराब होतात असे होऊ नये म्हणून खास युक्ती...

महागडे ड्रायफ्रुट्स खराब होऊ नयेत म्हणून करा ८ गोष्टी, कुबट वास येणार नाही...

आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या डाएटमध्ये ड्रायफ्रुटस खाणे पसंत करतो. ड्रायफ्रुटस महाग असल्यामुळे आपण खूप विचार करूनच खरेदी करतो. ड्रायफ्रुटस साठवून ठेवताना व्यवस्थित स्टोअर (There Are A Few Things You Should Know Before Storing Dry Fruits) करून ठेवावे लागतात. असे न केल्यास त्यात छोट्या अळ्या किंवा किड लागू शकते किंवा बुरशी लागून (: How to store dry fruits and nuts for maximum freshness) ते खराब होऊ शकतात. आपण स्टोअर करुन ठेवलेले ड्रायफ्रुटस जसे की, काजू, पिस्ता, बदाम, अक्रोड हे काहीवेळा मऊ पडतात किंवा बुरशी लागून खराब होतात. असे होऊ नये यासाठी ड्रायफ्रुटस स्टोअर करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवूयात.

महागडे ड्रायफ्रुट्स खराब होऊ नयेत म्हणून करा ८ गोष्टी, कुबट वास येणार नाही...

बदाम खराब न होता दीर्घकाळ चांगले टिकून राहावे यासाठी आपण चमचाभर साखरेचा वापर करु शकतो. यासाठी बदाम स्टोअर करुन ठेवलेल्या डब्यांत चमचाभर साखर घालावी यामुळे बदाम खराब न होता त्यांच्या कुरकुरीतपणा कायम टिकून राहतो.

महागडे ड्रायफ्रुट्स खराब होऊ नयेत म्हणून करा ८ गोष्टी, कुबट वास येणार नाही...

मनुका खराब होऊ नये म्हणून छोट्या सिलिकॉन पाकिटाचा वापर करावा. यासाठी मनुका ज्या डब्यांत स्टोअर करणार त्या डब्याच्या झाकणावर छोटासा चिकटपट्टीचा तुकडा चिकटवून त्यावर ते सिलिकॉनचे पाकीट चिकटवून घ्यावे.

महागडे ड्रायफ्रुट्स खराब होऊ नयेत म्हणून करा ८ गोष्टी, कुबट वास येणार नाही...

पिस्ता खराब होऊ नये म्हणून तांदुळाच्या दाण्यांचा वापर करावा. यासाठी एक टिश्यू पेपर घेऊन त्यात चमचाभर तांदूळ घालावे आणि या टिश्यू पेपरची घडी घालून पिस्ता स्टोअर केलेल्या डब्यांत ठेवावे. यामुळे पिस्ता खराब न होता दीर्घकाळ चांगला टिकून राहतो.

महागडे ड्रायफ्रुट्स खराब होऊ नयेत म्हणून करा ८ गोष्टी, कुबट वास येणार नाही...

शेंगदाणे खराब होऊ नयेत म्हणून ते स्टोअर कारण्यापूर्वी कोरडे भाजून घ्यावेत, आणि मगच कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवावे यामुळे शेंगदाणे खराब न होता दीर्घकाळ चांगले टिकून राहतात.

महागडे ड्रायफ्रुट्स खराब होऊ नयेत म्हणून करा ८ गोष्टी, कुबट वास येणार नाही...

फ्रिजमध्ये मध्ये किंवा थंड ठिकाणी सुकामेवा स्टोअर करून ठेवल्याने तो लवकर खराब होत नाही. मात्र जर आपण अतिशय उबदार किंवा उष्ण असलेल्या ठिकाणी, ओलसर ठिकाणी किंवा अती उष्ण जागी सुकामेवा ठेवला तर त्याला किड किंवा बुरशी लागण्याची शक्यता निर्माण होते.

महागडे ड्रायफ्रुट्स खराब होऊ नयेत म्हणून करा ८ गोष्टी, कुबट वास येणार नाही...

आपण सुकामेवा जास्त काळ टिकवण्यासाठी ते तव्यावर थोडे रोस्ट करून मग स्टोअर करू शकता. ज्यामुळे त्यांना किड लागणार नाही आणि ते जास्त दिवस टिकू शकतील. आपण ते टेस्टी करण्यासाठी त्यांना खारवून म्हणजेच मीठ लावून मग ते रोस्ट करून टिकवून ठेवू शकता. ज्यामुळे ते टेस्टी होतील आणि जास्त दिवस टिकतील.

महागडे ड्रायफ्रुट्स खराब होऊ नयेत म्हणून करा ८ गोष्टी, कुबट वास येणार नाही...

ड्रायफ्रुट्स स्टोअर करताना या कंटेनरमध्ये ६ ते ७ लवंगाच्या काड्या ठेवाव्यात यामुळे ड्रायफ्रुटस खराब होत नाही. तसेच लवंगांमुळे त्यांचा नैसर्गिक सुगंध आणि चव जशीच्या तशी टिकून राहण्यास मदत होते.

महागडे ड्रायफ्रुट्स खराब होऊ नयेत म्हणून करा ८ गोष्टी, कुबट वास येणार नाही...

लवंगांप्रमाणेच आपण ड्रायफ्रुटस स्टोअर करण्यासाठी मिठाचा देखील वापर करु शकतो. यासाठी ड्रायफ्रुटस स्टोअर करुन ठेवलेल्या डब्यात चमचाभर मीठ घालावे. यामुळे ड्रायफ्रुटसमध्ये किड, अळ्या होत नाहीत.