पराठे कोरडे - सुके होतात? ७ टिप्स, परफेक्ट सॉफ्ट - मऊमुलायम पराठ्यांसाठी लक्षात ठेवा...

Updated:January 24, 2025 18:52 IST2025-01-24T18:43:19+5:302025-01-24T18:52:21+5:30

easy tricks to make soft & fluffy paratha : How to make soft Paratha : 7 tips to make softer parathas : How to make paratha softer : कितीही चांगली कणीक मळली तरीही पराठे कोरडेच होत असतील तर या खास ७ टिप्स...

पराठे कोरडे - सुके होतात? ७ टिप्स, परफेक्ट सॉफ्ट - मऊमुलायम पराठ्यांसाठी लक्षात ठेवा...

अनेकदा चपात्या खायचा कंटाळा आला की आपण वेगवेगळ्या (How to make paratha softer) प्रकारचे पराठे करतो. पराठे आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. परंतु शक्यतो एकदा तयार करून ठेवलेले पराठे एका ठराविक काळानंतर वाळून कोरडे - कडक ( 7 tips to make softer parathas) होतात. असे कोरडे पराठे खायला कुणालाच आवडत नाही. पराठे तयार करताना आपण काही छोट्या चुका करतो ज्यामुळे पराठे कोरडे - कडक, सुके होतात. असे होऊ नये यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवूयात.

पराठे कोरडे - सुके होतात? ७ टिप्स, परफेक्ट सॉफ्ट - मऊमुलायम पराठ्यांसाठी लक्षात ठेवा...

पराठा तयार करताना त्याची कणीक भिजवताना पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करावा. हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ एकदम कोरडे किंवा घट्ट मळू नये. पुरेसे पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्यावे.

पराठे कोरडे - सुके होतात? ७ टिप्स, परफेक्ट सॉफ्ट - मऊमुलायम पराठ्यांसाठी लक्षात ठेवा...

पराठ्यासाठीचे कणीक मळताना त्यात गरजेनुसार दही - दुध घालावे. दही किंवा दूध घातल्याने पिठात ओलावा टिकून राहण्यास मदत होते, ज्यामुळे पराठे मऊ होतात.

पराठे कोरडे - सुके होतात? ७ टिप्स, परफेक्ट सॉफ्ट - मऊमुलायम पराठ्यांसाठी लक्षात ठेवा...

पीठ मळून घेतल्यानंतर ते १० ते १५ मिनिटे झाकून ठेवणे फार महत्वाचे असते. यामुळे पीठ तयार होण्याची आणि त्यातील ग्लूटेन विकसित होण्याची प्रक्रिया सुरु असते, ज्यामुळे पराठे मऊ आणि नरम होतात. कणीक सेट करायला ठेवल्याने कणकेला एक प्रकारची लवचिकता येते आणि पराठे लाटणे सोपे होते.

पराठे कोरडे - सुके होतात? ७ टिप्स, परफेक्ट सॉफ्ट - मऊमुलायम पराठ्यांसाठी लक्षात ठेवा...

पराठे लाटताना थोडं तेल किंवा तूप लावल्याने त्यांचा पोत सुधारतो आणि लाटताना फाटत नाहीत. पराठे लाटण्याआधी थोडं तेल किंवा तूप लावा, यामुळे पीठ गुळगुळीत मऊ होईल आणि पराठे लाटणे सोपे होईल. या पद्धतीमुळे पराठ्याचे थर मऊ आणि नरम होतात. पराठा भाजून तयार झाल्यावर देखील त्यावर थोडेसे तेल - तूप लावावे.

पराठे कोरडे - सुके होतात? ७ टिप्स, परफेक्ट सॉफ्ट - मऊमुलायम पराठ्यांसाठी लक्षात ठेवा...

पराठे भाजताना गॅस मध्यम आचेवरच ठेवावा. हाय फ्लेमवर, पराठा बाहेरून लवकर शिजतो पण आतून कच्चा राहू शकतो किंवा जळू शकतो, ज्यामुळे त्याची चव खराब होऊ शकते. त्याचवेळी, मंद आचेवर, पराठा जास्त वेळ तव्यावर राहतो, ज्यामुळे तो कडक आणि कोरडा होऊ शकतो. मध्यम आचेवर पराठा भाजल्याने तो आतून व्यवस्थित शिजतो आणि बाहेरून हलका कुरकुरीत व सोनेरी लेअर तयार होतो.

पराठे कोरडे - सुके होतात? ७ टिप्स, परफेक्ट सॉफ्ट - मऊमुलायम पराठ्यांसाठी लक्षात ठेवा...

पराठे व्यवस्थित भाजण्यासाठी कास्ट आयर्न किंवा नॉन-स्टिक पॅन वापरणे खूप फायदेशीर ठरते.

पराठे कोरडे - सुके होतात? ७ टिप्स, परफेक्ट सॉफ्ट - मऊमुलायम पराठ्यांसाठी लक्षात ठेवा...

पराठे तव्यावरुन खाली काढल्याबरोबर गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करावेत, कारण ते थंड झाल्यावर कडक होतात आणि चवीवरही परिणाम होतो. पराठे लगेच सर्व्ह करणे शक्य नसेल तर अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवा. त्यांना ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळल्याने ओलावा टिकवून ठेवण्यास आणि जास्त काळ मऊ ठेवण्यास मदत होते.