छान सुगंध येणारी दालचिनी शुद्ध असतेच असं नाही! सावध व्हा- दालचिनीमधली भेसळ वेळीच ओळखा

Published:November 3, 2024 10:31 AM2024-11-03T10:31:38+5:302024-11-03T10:35:02+5:30

छान सुगंध येणारी दालचिनी शुद्ध असतेच असं नाही! सावध व्हा- दालचिनीमधली भेसळ वेळीच ओळखा

मसाल्याच्या पदार्थांमध्ये दालचिनी हा एक महत्त्वाचा पदार्थ. आपण मसाल्यांमध्ये तर दालचिनी टाकतोच. पण ती अतिशय आरोग्यदायी असते म्हणून बरेच जण दालचिनीचे पाणी किंवा काढादेखील दररोज सकाळी नियमितपणे घेतात. (Expert Reveals How To Check adulteration in Cinnamon?)

छान सुगंध येणारी दालचिनी शुद्ध असतेच असं नाही! सावध व्हा- दालचिनीमधली भेसळ वेळीच ओळखा

पण हल्ली जशी बऱ्याच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते तशीच भेसळ दालचिनीमध्येही केली जाते (how to check the purity of Cinnamon?). त्यामुळेच दालचिनीच्या सुगंधाला भुलून जाऊ नका. तुम्ही आरोग्यदायी समजून जी दालचिनी खाता, ती खरंच आरोग्यासाठी उत्तम आहे ना, तिच्यामध्ये कोणतीही भेसळ नाही ना हे एकदा तपासून घ्या..

छान सुगंध येणारी दालचिनी शुद्ध असतेच असं नाही! सावध व्हा- दालचिनीमधली भेसळ वेळीच ओळखा

दालचिनीमध्ये कॅसिया हा एक पदार्थ टाकला जातो. ज्याचा सुगंध अगदी दालचिनीसारखाच असला तरी तो खूप उग्र असतो. अशी उग्र वासाची दालचिनी घेऊ नका. खऱ्या दालचिनीला मंद सुगंध असतो.

छान सुगंध येणारी दालचिनी शुद्ध असतेच असं नाही! सावध व्हा- दालचिनीमधली भेसळ वेळीच ओळखा

खरी दालचिनी बाहेरून गुळगुळीत, पातळ असते. तिच्यावर कोणतेही ठिपके, रेषा नसतात.

छान सुगंध येणारी दालचिनी शुद्ध असतेच असं नाही! सावध व्हा- दालचिनीमधली भेसळ वेळीच ओळखा

कॅसिया अशा पद्धतीने सरळ असतो. तर खरी दालचिनी ही जणू एखादा कागद गुंडाळलेला असावा, अशी दिसते.