काय सांगता? स्वयंपाकघरातील 'या' ५ गोष्टींना नसते एक्सपायरी डेट; वर्षानुवर्षे करू शकता वापर
Updated:January 30, 2025 16:50 IST2025-01-30T16:43:04+5:302025-01-30T16:50:24+5:30
अनेक अन्नपदार्थ आहेत ज्यांची एक्सपायरी डेट नसते आणि तुम्ही ते वर्षानुवर्षे कोणताही संकोच केल्याशिवाय वापरू शकता.स्वयंपाकघरात ठेवलेल्या अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊया.

बाजारातून कोणताही अन्नपदार्थ खरेदी करताना किंवा स्वयंपाकघरात बराच काळ ठेवलेला कोणताही अन्नपदार्थ वापरण्यापूर्वी, आपल्यापैकी बहुतेक जण त्याची एक्सपायरी डेट नक्कीच तपासतात. याचाच अर्थ असा की तुम्ही एखादी विशिष्ट वस्तू किती दिवसांसाठी वापरू शकता हे यामुळे समजतं.
तुम्ही प्रत्येक उत्पादन फक्त ठराविक कालावधीसाठीच वापरू शकता असं काही नाही. कारण अनेक अन्नपदार्थ आहेत ज्यांची एक्सपायरी डेट नसते आणि तुम्ही ते वर्षानुवर्षे कोणताही संकोच केल्याशिवाय वापरू शकता.स्वयंपाकघरात ठेवलेल्या अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊया.
साखर वर्षानुवर्षे खराब होत नाही
साखर प्रत्येक घरात वापरली जाते. जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात भरपूर साखर साठवली असेल, तर तुम्हाला त्याच्या एक्सपायरी डेटबद्दल अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण जर साखर हवाबंद डब्यात व्यवस्थित साठवली तर ती वर्षानुवर्षे खराब होत नाही.
साखर डब्यातून काढण्यासाठी नेहमी कोरड्या चमच्याचा वापर करा. कोणत्याही प्रकारचं पाणी किंवा ओलावा डब्यात जाणार नाही याची खात्री करा. अशाप्रकारे तुम्ही साखरे वर्षानुवर्षे वापरू शकता.
तांदूळ बराच काळ साठवता येतो
भात हा आपल्या भारतीयांच्या आहाराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्याचा साठा जवळजवळ प्रत्येक घरात असतोच. तांदळाला एक्सपायरी डेट नसते त्यामुळे तुम्ही तो बराच काळ वापरू शकता. तांदूळ नेहमी मोठ्या हवाबंद डब्यात ठेवा.
दैनंदिन वापरासाठी तुम्ही थो़डा तांदूळ एका लहान डब्यात वेगळा ठेवू शकता. असं केल्याने तुम्हाला मोठा डब्बा पुन्हा पुन्हा उघडावा लागणार नाही आणि त्यामुळे त्यात ओलावा जाण्याचा धोका राहणार नाही.
सोया सॉसला एक्सपायरी डेट नाही
बहुतेक चायनीज पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा सोया सॉस वर्षानुवर्षे खराब होत नाही. कारण त्यात सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्यामुळे तो बराच काळ वापरला जाऊ शकतो.
सोया सॉस नेहमी काचेच्या बाटलीत आणि थंड ठिकाणी ठेवा. जर तुम्ही सोया सॉसची बाटली फ्रिजमध्ये ठेवली असेल तर ती दोन ते तीन वर्षे आरामात राहते.
मीठ देखील बराच काळ टिकतं
दररोज बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थात मीठ वापरलं जातं. मीठाशिवाय जेवणाला चवच येत नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मीठाची कोणतीही एक्सपायरी डेट नसते. तुम्ही मीठ हवाबंद डब्यात बराच काळ साठवू शकता.
मीठ हे एक नॅचरल प्रिझर्व्हेटिव्ह आहे, म्हणजेच लोणचे इत्यादी इतर गोष्टी दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करतं.
व्हिनेगरही खराब होत नाही
अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा व्हिनेगर देखील कधीही एक्सपायर होत नाही. मीठाप्रमाणेच, व्हिनेगरचा वापर अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी केला जातो, त्यामुळे ते खराब होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
व्हिनेगरचे अनेक प्रकार आहेत आणि तुम्ही ते सर्व वर्षानुवर्षे एक्सपायरी डेटची काळजी न करता वापरू शकता. व्हिनेगर फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही.