Join us

सावधान! झोपण्यापूर्वी 'हे' पदार्थ कधीही खाऊ किंवा पिऊ नका, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:39 IST

1 / 10
रात्रीच्या वेळी आपण जे खातो किंवा पितो यावरून आपल्याला नेमकी कशी झोप लागणार आहे हे अवलंबून असतं. ही गोष्ट आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. काही पदार्थ तणाव कमी करण्यात मदत करतात. तसेच तुम्हाला चांगली झोप देखील लागू शकते.
2 / 10
खाद्यपदार्थ हे खूप परिणामकारक ठरतात. असेही काही खाद्यपदार्थ आहेत जे झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतात, अस्वस्थता जाणवू शकते आणि अपचन होऊ शकतं. त्यामुळे दीर्घकालीन शारीरिक तसेच मानसिक आरोग्यविषयक समस्या देखील होऊ शकतात. झोपण्याआधी काय खाणं टाळलं पाहिजे हे जाणून घेऊया....
3 / 10
कॅफीन हे एक सामान्य उत्तेजक आहे जे तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतं. कारण ते तुमच्या मेंदूतील ॲडेनोसिन हे रसायन ब्लॉक करायचं काम करते, जे झोपेला प्रोत्साहन देतं. ज्यामुळे तुम्हाला अधिक सतर्क आणि जागृत वाटतं. कॅफीनचे परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात.
4 / 10
कॉफी, चहा, एनर्जी ड्रिंक्स आणि काही चॉकलेट्स म्हणजे कॅफीन असलेले काही सामान्य पदार्थ आणि पेय असतात. कॅफिन शरीरात किमान ३ ते ५ तास राहतं. खरं तर, आरोग्य तज्ञांच्या मते, रात्री कॉफी पिणं किंवा चॉकलेट खाण्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
5 / 10
मसालेदार पदार्थ खरंच खूप स्वादिष्ट असतात, परंतु ते झोपेच्या वेळी खाल्ल्यास त्रासदायक देखील ठरू शकतात. हे मसालेदार पदार्थ उष्णतेसाठी जबाबदार असतात. त्यामुळे झोपण्याच्या वेळेआधी मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीराचं तापमान वाढू शकतं.
6 / 10
पचनाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे शेवटी निद्रानाश होतो. झोपायच्या आधी मसालेदार पदार्थ खाणं हे कटाक्षाने टाळण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे यामुळे छातीत जळजळ, एसिड रिफ्लक्स किंवा अपचन होऊ शकतं, ज्यामुळे अस्वस्थ वाटतं.
7 / 10
संत्री, लिंबू आणि द्राक्षं यांसारखी काही फळं व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेली असतात, परंतु झोपेच्या वेळीआधी खाल्ल्यास ते तुमच्या पोटासाठी त्रासदायक ठरू शकतात. फळातील आंबटपणामुळे ऍसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ किंवा पोट खराब होऊ शकतं.
8 / 10
तळलेले पदार्थ हे पचायला जड असतात आणि झोपण्याच्या आधी सेवन केल्यास अस्वस्थता जाणवू शकते. या पदार्थांमुळे पचनक्रिया मंदावते. तसेच वजन देखील वाढण्याची शक्यता अधिक असते.
9 / 10
जास्त साखर असलेलं अन्न आणि पेय रक्तातील साखर वाढू शकतात, ज्यामुळे तुमच्या झोपेच्या पद्धतीत व्यत्यय येऊ शकतो. शुगर स्पाइकमुळे तुमची ऊर्जेची पातळी वाढते, त्यामुळे झोप लागणं कठीण होतं.
10 / 10
रात्री रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं किंवा भूकही लागते. जास्त साखरेचे पदार्थ अनेकदा क्रेव्हिंग वाढवतात, ज्यामुळे रात्री भूक लागते, ज्यामुळे तुमच्या एकूण आरोग्याला हानी पोहोचू शकते.
टॅग्स : अन्नहेल्थ टिप्सआरोग्य