२०२४ मध्ये भारतीयांनी गुगल केले ' हे ' १० पदार्थ - खाल्ले आणि खिलवलेही! सांगा, तुम्ही कुठला पदार्थ केला...

Updated:December 13, 2024 17:07 IST2024-12-13T16:52:31+5:302024-12-13T17:07:31+5:30

These top 10 recipes sparked India's interest in 2024 : Most Searched Recipes Of 2024 : Google reveals the list of top 10 most searched recipes of 2024 in India : गुगलवर २०२४ या वर्षात सर्वाधिक कोणत्या रेसिपीज सर्च करण्यात आल्या ते पहा...

२०२४ मध्ये भारतीयांनी गुगल केले ' हे ' १० पदार्थ - खाल्ले आणि खिलवलेही! सांगा, तुम्ही कुठला पदार्थ केला...

वर्षाअखेरीस डिसेंबर महिना सुरु झाला की आपण सगळेच सरत्या वर्षाचा एक आढावा घेतो. वर्षभरात काय काय घटना घडल्या, कोणत्या गोष्टी होऊन गेल्या याचा विचार आपण करतोच. त्याचप्रमाणे गुगल (Most Searched Recipes Of 2024) देखील वर्षभरात काय काय घडलं याची झलक तुम्हाला दाखवते. गेल्या वर्षभरात गुगलवर लोकांनी काय सर्च केले याचा एक आढावाच गुगलकडून काढला जातो. दरवर्षी गुगलकडून यासंदर्भातील आकडेवारी जारी केली जाते. गुगलवर आर्थिक नियोजनापासून ते रेसिपीपर्यंत अनेक गोष्टी सर्च केल्या जातात. तर, यंदा भारतीयांनी कोणत्या रेसिपी सर्च केल्या हे गुगलने दाखवलं आहे. भारतात गुगलवर सर्च करण्यात आलेल्या सर्वाधिक रेसिपीची यादीच गुगलने जाहीर केली आहे. कोणत्या आहेत या रेसिपी हे पाहूयात(Google reveals the list of top 10 most searched recipes of 2024 in India).

२०२४ मध्ये भारतीयांनी गुगल केले ' हे ' १० पदार्थ - खाल्ले आणि खिलवलेही! सांगा, तुम्ही कुठला पदार्थ केला...

१. हिंदुस्थान टाईम्स यांनी दिलेल्या या यादीनुसार गुगलवर सगळ्यात जास्त शोधला गेलेला पाहिला पदार्थ आहे, पॉर्न स्टार मार्टिनी कॉकटेल. पॅशन फ्रुट, व्हॅनिला, वाईन आणि वोडका यांचे मिश्रण असलेले हे कॉकटेल आहे. या कॉकटेलची सोपी रेसिपी भारतात मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आली आहे.

२०२४ मध्ये भारतीयांनी गुगल केले ' हे ' १० पदार्थ - खाल्ले आणि खिलवलेही! सांगा, तुम्ही कुठला पदार्थ केला...

२. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यांचेच आवडते आंब्याचे लोणचे आहे. चटकदार, चटपटीत आंब्याचं लोणचं हा उन्हाळ्यातला एकदम हिट पदार्थ आहे. भातासोबत किंवा पराठ्यासोबत लोणचं खाल्लं जातं. आंब्याचं लोणचं कसं बनवायचं हे 2024 मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलं होतं.

२०२४ मध्ये भारतीयांनी गुगल केले ' हे ' १० पदार्थ - खाल्ले आणि खिलवलेही! सांगा, तुम्ही कुठला पदार्थ केला...

३. धनिया पंजिरी हा गोड पदार्थ असून भगवान श्रीकृष्णासाठी जन्माष्टमीच्या दिवशी नैवेद्य म्हणून खास तयार केला जातो. पंजिरी कशी करायची, तिचे आरोग्याला फायदे काय असा बराच शोध गुगलवर घेतला गेला आहे.

२०२४ मध्ये भारतीयांनी गुगल केले ' हे ' १० पदार्थ - खाल्ले आणि खिलवलेही! सांगा, तुम्ही कुठला पदार्थ केला...

४. चौथ्या क्रमांकावर उगडी पचडी हा एक विशेष पदार्थ आहे. ही डिश खासकरुन तेलगु नव वर्षाला केली जाते. कडुलिंबाची पाने, कैरी, गुळ, मिरपूड, खोबरं आणि मीठ वापरून हा पदार्थ केला जातो. हा पदार्थ आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या भागात सणसमारंभांना केला जातो. आंबट, तुरट, गोड अशी संमिश्र चव असणारा हा पदार्थ आहे.

२०२४ मध्ये भारतीयांनी गुगल केले ' हे ' १० पदार्थ - खाल्ले आणि खिलवलेही! सांगा, तुम्ही कुठला पदार्थ केला...

५. गुगलवर पाचव्या क्रमांकावर शोधला गेलेला पदार्थ आहे पंचामृत. आपल्याकडे कोणत्याही पुजेसाठी पंचामृत लागतंच. दूध, दही, तूप, गूळ, मध हे पाच पदार्थ असणारे पंचामृत कसे करतात, याबाबत बहुसंख्य लोकांच्या मनात उत्सूकता दिसून आली.

२०२४ मध्ये भारतीयांनी गुगल केले ' हे ' १० पदार्थ - खाल्ले आणि खिलवलेही! सांगा, तुम्ही कुठला पदार्थ केला...

६. Ema Datshi हा एक रस्सा प्रकार आहे. काळिमिरी आणि चिज यापासून हा पदार्थ तयार केला जातो. भारतात अभिनेत्री दिपीका पदुकोणमुळे हा पदार्थ प्रसिद्ध झाला होता. दिपीका पदुकोणचा हा सगळ्यांत आवडता पदार्थ आहे.

२०२४ मध्ये भारतीयांनी गुगल केले ' हे ' १० पदार्थ - खाल्ले आणि खिलवलेही! सांगा, तुम्ही कुठला पदार्थ केला...

७. Flat White हा एक कॉफीचा सर्वात लोकप्रिय प्रकार असून हा एक्सप्रेसो आणि स्टीम मिल्कपासून तयार केला जातो. मार्च २०२४ मध्ये गुगलने याचे डुडल देखील काढले होते.

२०२४ मध्ये भारतीयांनी गुगल केले ' हे ' १० पदार्थ - खाल्ले आणि खिलवलेही! सांगा, तुम्ही कुठला पदार्थ केला...

८. कांजी हे उत्तर भारतात बनवण्यात येणारे लोकप्रिय पेय आहे. पाणी, गाजर, बीट, मोहरी आणि हिंग वापरून हे पेय बनवण्यात येते.

२०२४ मध्ये भारतीयांनी गुगल केले ' हे ' १० पदार्थ - खाल्ले आणि खिलवलेही! सांगा, तुम्ही कुठला पदार्थ केला...

९. दिवाळीत महाराष्ट्रामध्ये घराघरात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शंकरपाळी. भारतात २०२४ मध्ये शंकरपाळी हा पदार्थ सर्वाधिक सर्च करण्यात आला.

२०२४ मध्ये भारतीयांनी गुगल केले ' हे ' १० पदार्थ - खाल्ले आणि खिलवलेही! सांगा, तुम्ही कुठला पदार्थ केला...

१०. २०२४ च्या सर्वाधिक लोकप्रिय प्रकारांमधील सगळ्यांत शेवटचा पदार्थ आहे Chammanthi Podi. ही एका प्रकारची चटणी आहे. साखर, चिंच,आलं,कांदा वापरुन केरळात ही चटणी केली जाते.