Google Search: Most searched recipes by Indians in the year 2022
Google Search: २०२२ मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्वात जास्त शोधलेल्या ८ रेसिपी पाहा नेमक्या कोणत्याPublished:December 10, 2022 05:01 PM2022-12-10T17:01:44+5:302022-12-10T17:11:40+5:30Join usJoin usNext १. जसं कोरोनामुळे लॉकडाऊन आलं तसं गुगलवर शोधल्या जाणाऱ्या रेसिपींचं प्रमाण प्रचंड वाढलं. आता लॉकडाऊन नसलं तरी गुगलवर शोधून (google search) रेसिपी (recipe) ट्राय करून बघण्याचा ट्रेण्ड मुळीच कमी झालेला नाही. २. कारण गुगलवर वेगवेगळ्या पदार्थांच्या एवढ्या रेसिपी आणि त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत की आता कोणताही नवा पदार्थ शिकणे अगदी सोपे झाले आहे. शिवाय कुणाला काहीच विचारायची गरज नाही. एका क्लिकवर सगळ्या रेसिपी आपल्याला मिळतात. ३. त्यामुळे २०२२ यावर्षीही वेगवेगळे पदार्थ कसे करायचे, याविषयी शोध घेण्यात आला. आता त्यात भारतीय लोकांनी नेमक्या कोणत्या पदार्थांच्या रेसिपी पाहिल्या, याची माहिती नुकतीच गुगलतर्फे शेअर करण्यात आली आहे. बघा तुम्हीही असे काही पदार्थ शोधले होते का ४. २०२२ मध्ये सर्वाधिक भारतीयांकडून शोधला गेलेला पदार्थ म्हणजे फ्रुट कॉकटेल. हे कॉकटेल कसं करायचं, याविषयी अनेकांनी वेगवेगळ्या रेसिपी शोधल्या होत्या, असा अहवाल गुगल देत आहे. ५. पेय, सरबत या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक लोकांनी वेगवेगळ्या हेल्थ ड्रिंकचाही शोध घेतला होता. यावरूनच हेल्थ अवेअरनेस वाढतो आहे, हे लक्षात येतं. ६. दुसरा सर्वाधिक शोधला गेलेला पदार्थ म्हणजे पनीर पसंदा. हा पदार्थ तर २०२२ मध्ये जगभरातील लोकांकडून सर्वाधिक शोधला गेलेला पदार्थ ठरला आहे. भारतासह बांग्लादेश आणि पाकिस्तान येथील खवय्यांनी पनीर पसंदाचा सर्वाधिक शोध घेतला. ७. लहान मुलांसकट मोठ्या मंडळींचाही आवडीचा पदार्थ म्हणजे पिझ्झा. पण त्यापैकी मार्गारिटा पिझ्झा ही रेसिपी बहुसंख्य लोकांनी शोधली. ८. भारतात झालेल्या गुगल सर्चपैकी गोड पदार्थांमध्ये ज्या पदार्थाने बाजी मारली तो पदार्थ होता मोदक. ९. त्या खालोखाल संत्र्याचा ज्यूसही शोधला गेला. १०. पनीर भुर्जी या पदार्थानेही चांगलीच बाजी मारली आहे. अनेकांच्या मनात त्याबाबत उत्सूकता दिसून आली. ११. या यादीमध्ये असणारा आणखी एक पदार्थ म्हणजे मलाई कोफ्ता. आता सांगा या यादीपैकी तुम्ही कोणकोणत्या पदार्थांचा शोध घेतला होताटॅग्स :अन्नपाककृतीगुगलfoodRecipegoogle