Join us

गुढीपाडवा स्पेशल: श्रीखंड केलं की त्यात ५ पदार्थ नक्की घाला, श्रीखंड लागेल अजून खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 17:04 IST

1 / 6
गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत आवर्जुन केलाच जातो. श्रीखंडाचा या दिवशी मोठाच मान असतो. म्हणूनच ते जास्त चवदार होण्यासाठी त्यात पुढे सांगितलेले काही पदार्थ आठवणीने घालून पाहा..
2 / 6
केशरामुळे श्रीखंडाला जास्त छान स्वाद येतो. त्यामुळे केशराच्या ७ ते ८ काड्या अगदी चमचाभर कोमट पाण्यात काही वेळ भिजत ठेवा आणि ते पाणी श्रीखंडात घाला. श्रीखंडाचा रंग आणि स्वाद खुलेल.
3 / 6
श्रीखंडाला उत्तम स्वाद येण्यासाठी थोडीशी वेलची पावडर सुद्धा आवर्जून घाला.
4 / 6
श्रीखंडाला जर जायफळाची जोड दिली तर ते अधिक चवदारही होतं शिवाय आरोग्यासाठीही अधिक उत्तम ठरतं.
5 / 6
श्रीखंडामध्ये थोडा सुकामेवा हवाच. त्यामुळे काजू, बदाम, पिस्ता यांचे काप श्रीखंडात घालायला विसरू नका.
6 / 6
श्रीखंड घट्ट आणि रवाळ होण्यासाठी काही जणी त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर सुद्धा घालतात. यामुळे श्रीखंडाचा फ्लेवर आणि टेक्स्चर बदलते.
टॅग्स : अन्नगुढीपाडवापाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.