गुढीपाडवा विशेष: मराठी नववर्ष स्पेशल ६ पारंपरिक पदार्थ; तुमच्या आवडीचा कोणता? वर्षाची गोड सुरुवात.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2024 12:00 PM 1 / 8मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडव्याचा सण. आपली खाद्यसंस्कृती इतकी समृद्ध आहे की प्रत्येक सणाला वेगवेगळ्या पदार्थांचे महत्त्व असते.2 / 8गुढीपाडव्याच्या सणालाही काही खास पदार्थ आवर्जून केले जातात. ते पदार्थ कोणते ते पहा आणि तुमची त्या पदार्थांची तयारी झाली आहे की नाही हे देखील यानिमित्ताने एकदा तपासून घ्या.3 / 8एरवी आपल्याकडे सणासुदीला पुरणपोळीचा मान असतो. पण गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र गोड पदार्थांमध्ये वर्णी लागते ती श्रीखंडाची.4 / 8आता श्रीखंड केले म्हणजे त्याच्यासोबत पुरी आलीच. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड- पुरीचा बेत असतो.5 / 8कडुलिंबाच्या फुलांची- पानांची चटणी हा एक पारंपरिक पदार्थ या दिवशी हमखास केलाच जातो. या दिवशी ही चटणी चाखली की पुढे वर्षभर आपण निरोगी राहतो असं मानलं जातं. 6 / 8या दिवसात कैरी भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे कैरीचं पन्हं देखील गुढीपाडव्याला केलं जातं. 7 / 8कैरीच्या पन्हाप्रमाणेच कैरी घालून केलेल्या वाटल्या डाळीचे महत्त्वही गुढीपाडव्याला असते.8 / 8साखरेच्या गाठीही याच सणाच्या काळात पाहायला मिळतात. गुढीलाही साखरेची गाठी घातली जाते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही गाठी घातलेले पाणी प्यावे, असं म्हणतात. आणखी वाचा Subscribe to Notifications