ना कमी, ना जास्त... फक्त चिमूटभर मीठ आहे फायदेशीर; १ महिना खाल्लं नाही तर काय होईल?
Updated:March 3, 2025 12:55 IST2025-03-03T12:47:22+5:302025-03-03T12:55:13+5:30
जर एखाद्या व्यक्तीने महिनाभर म्हणजे ३० दिवस मीठ खाणं बंद केले तर काय होईल ते जाणून घेऊया...

मीठ पचनक्रियेच्या योग्य कार्यासाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही ते पूर्णपणे खाणे बंद केलं तर पचनक्रिया मंदावू शकते. यामुळे भूक कमी होऊ शकते आणि शरीर कमकुवत होऊ शकतं, म्हणून असं करणं टाळा.
मीठामध्ये सोडियम आढळतं, जे मानवी शरीरात पाण्याची योग्य पातळी राखण्यास आणि सर्व अवयवांना ऑक्सिजन आणि इतर पोषक तत्वं पोहोचवण्यास मदत करतं. हे रक्तवहिन्यासंबंधी आरोग्य आणि मज्जासंस्थेला ऊर्जा प्रदान करतं. याचा अर्थ असा की मीठ केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
जास्त प्रमाणात मीठाचं सेवन केल्यास ते हानिकारक देखील ठरू शकतं. त्याच्या अतिरेकामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीने महिनाभर म्हणजे ३० दिवस मीठ खाणं बंद केले तर काय होईल ते जाणून घेऊया...
चव बदलेल
३० दिवस मीठ खाणं टाळल्याने जिभेच्या टेस्ट रिसेप्टर्सवर परिणाम होऊ शकतो. सुरुवातील अन्न खाताना थोडं फिकं वाटेल पण नंतर तुमची चव सुधारेल आणि तुम्हाला अन्नाची खरी नैसर्गिकरिक चव जाणवेल.
ब्लड प्रेशर लेव्हल कमी होणे
मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. जर तुम्ही मीठ सेवन केलं नाही तर हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो परंतु लो ब्लड प्रेशर असलेल्यांना अशक्तपणा आणि चक्कर येणं यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
किडनीचं कार्य सुधारेल
जास्त मीठ किडनीवर एक्स्ट्रा प्रेशर टाकतं, कारण त्यांना शरीरातून अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यासाठी काम करावं लागतं. मीठ न खाल्ल्याने किडनीचं कार्य सुधारेल आणि शरीर डिटॉक्स होईल.
अशक्तपणा-थकवा
सोडियम शरीराचे इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्याचं काम करतं. जर तुम्ही मीठ खाणं पूर्णपणे बंद केलं तर थकवा, स्नायू कमकुवत होणं आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
हृदयाच्या आरोग्यावर परिणाम
जे लोक कमी मीठ खातात त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो, परंतु कधीकधी ते पूर्णपणे सोडून देणं योग्य नसतं. कारण शरीराला सोडियमची संतुलित मात्रा आवश्यक असते, ज्याची कमतरता हानिकारक असू शकते.