Join us

रंग खेळून दमलेल्या दोस्तांना नाश्ता काय देणार? ५ पदार्थ- करायला सोपे- चवीला चटकदार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2025 14:38 IST

1 / 6
रंग खेळल्यानंतर काही वेळ सगळेच दमतात, थकतात..(holi celebration 2025) अशावेळी त्यांना काहीतरी रिफ्रेशिंग स्नॅक्स पाहिजे असतो.. म्हणूनच हे काही पदार्थ पाहा आणि रंग खेळून दमलेल्या तुमच्या मित्रमंडळींना खाऊ घाला.. रंगांसोबत अशा चवदार पदार्थांची ट्रिट मिळाली तर नक्कीच सगळे खुश होतील.
2 / 6
करायला सोपा आणि सगळ्यांना आवडणार पदार्थ म्हणजे भेळ. मुरमुरे, फरसाण, शेव एकत्र करून ठेवा. चिंच- गूळ तसेच पुदिन्याचे पाणीही करून ठेवा. कांदा, टोमॅटो, कैरी कापून ठेवा. आयत्यावेळी सगळे पदार्थ एकत्र केले की चटकदार भेळ झाली तयार..
3 / 6
दुसरा पदार्थ म्हणजे थंडाई. थंडाईसारखे रिफ्रेशिंग पेय होळीच्या दिवशी असूच शकत नाही.. थंडाई पिणे खूप आरोग्यदायीही असते.
4 / 6
घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी तुम्ही सामोसा, कचोरी असे पदार्थही आणून ठेवू शकता. आयत्यावेळी मायक्रोवेव्हमध्ये गरम करून ते सर्व्ह करा..
5 / 6
उत्तरेकडच्या राज्यांमध्ये होळीच्या दिवशी दहीवडे करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दहीवड्यांचा बेतही तुम्ही होळीच्या निमित्ताने करू शकता..
6 / 6
गरमागरम इडली- सांबार खाऊनही तुमचे मित्रमंडळी खुश होतील. इडली आणि सांबार दोन्हीही आधीच करून ठेवा. इडल्या थंड झाल्या तरी त्यावर गरमागरम सांबार घालून खाता येऊ शकतात.
टॅग्स : होळी 2025होलिका दहनअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीकिचन टिप्स