भाजीत मीठ जास्त पडलंय? खारटपणा कमी करण्यासाठी १ ट्रिक वापरा, भाजी होईल परफेक्ट चवीची
Updated:June 17, 2024 17:17 IST2024-06-16T15:44:37+5:302024-06-17T17:17:40+5:30
How Manage Salt In Vegetable : डाळ किंवा ग्रेव्हीमध्ये जास्त मीठ पडलं तर तुम्ही त्यात चपातीच्या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घालू शकता.

भाजीत जास्त मसाला जास्त झाला की पाणी जास्त झाले की ते अडजस्ट करणं सोपं असतं. पण जर भाजीत मीठ जास्त झालं तर जेवणाची चवच बिघडते. अशावेळी अन्न वाया जातं तर कधी जेवणाऱ्याचा मूड खराब होतो. अशावेळी लोक रेसेपीमध्ये पाणी किंवा दही मिसळण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे जेवणाची चव बिघडू शकते. (5 Ways To Neutralize Salt In Food)
डाळ किंवा ग्रेव्हीमध्ये जास्त मीठ पडलं तर तुम्ही त्यात चपातीच्या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घालू शकता. काही वेळातच त्यातलं एक्स्ट्रा मीठ कमी होईल. मीठ व्यवस्थित झाल्यानंतर पीठाच्या गोळ्या काढून टाका.
लिंबू किंवा चिंचेचा रस
जर तुम्ही अशी रेसिपी बनवत असाल त्यात आंबटपणा एड केल्याने चव वाढू शकते. तर त्यात लिंबाचा रस मिसळून घ्या. यात तुम्ही चिंचेचा रसदेखील मिसळू शकता. ज्यामुळे त्याची चव वाढेल. आंबटपणामुळे मीठाचा परिणाम कमी होतो.
ब्रेडचा वापर करा
जर ग्रेव्हीमध्ये मीठ कमी असेल किंवा घरात ब्रेड पडले असतील तर तुम्ही उरलेल्या ब्रेडच्या मदतीने मिठाचे प्रमाण कमी करू शकता. यासाठी भाजीत २ ते ३ ब्रेडचे स्लाईस घाला. ३ ते ४ मिनिटांनी काढून टाका.
बेसन किंवा सातूच्या पिठाचा वापर
भाजीत मिठाचं प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही बेसन किंवा सातूच्या पिठाचा वापर करू शकता. यासाठी २ चमचे बेसन तव्यावर भाजून घ्या नंतर गरजेनुसार भाजी मिसळून त्यात घाला. त्याऐवजी तुम्ही सातूचा वापरही करू शकता.
भाजीत मीठ जास्त पडलं तर तुम्ही त्यात पाणी घालून भाजी वाढवू शकतात. कमी गॅसवर भाजी शिजवून घ्या.
(Image Credit- Social Media)