गव्हाच्या डब्यात पोरकिडे-अळ्या दिसतात? गव्हात किचनमधले ५ पदार्थ ठेवा; वर्षानुवर्ष किड लागणार नाही
Updated:September 19, 2024 18:23 IST2024-09-19T17:39:21+5:302024-09-19T18:23:27+5:30
How To Avoid Wheat Bugs : पुदिन्याची सुकलेली पानं आणि कारल्याची सुकलेली सालं वापरून तुम्ही गहू अनेक महिले चांगले ठेवू शकता.

प्रत्येकाच्याच घरी गव्हाच्या चपात्या आवडीने खाल्ल्या जातात. चपाती मऊ, स्वादीष्ट होण्यासाठी गहू चांगले, स्वच्छ असणं फार महत्वाचे असते. गव्हाला किड लागू नये म्हणून तुम्ही अनेक उपाय करू शकता. (How To Get Rid Of Wheat Bugs)
जर घरात गव्हाची गोणी असेल आणि गव्हाला वारंवार किड लागत असेल तर काही सोपे उपाय करून तुम्ही गहू वर्षानुवर्ष चांगले ठेवू शकता.
गव्हाला किड लागू नये यासाठी तुम्ही तिखट पदार्थांचा वापर करू शकता. कारण तिखटाच्या वासाने किडे, अळ्या दूर होतात.
कडुलिंबाची पानं व्यवस्थित सुकवून नंतर गव्हाच्या टाकीत घाला. त्यामुळे गहू चांगले राहतील. कडूलिंबाची पानं न सुकवता कधीच गव्हाच्या डब्यात ठेवू नका.
कडुलिंबाबरोबर गव्हात कापूर आणि लवंगसुद्धा घाला. कापूर आणि लवंगाच्या तीव्र वासाने किटक दूर राहतात.
पुदिन्याची सुकलेली पानं आणि कारल्याची सुकलेली सालं वापरून तुम्ही गहू अनेक महिले चांगले ठेवू शकता.
लसूणाचा सुगंध तीव्र असते. ज्यामुळे किडे आसपासही भटकत नाहीत. घरात ठेवलेल्या गव्हाच्या पोत्यात लसूण न सोलता घाला. लसूण सुकल्यानंतर बदलून दुसरे लसूण घाला.
गहू चांगले ठेवण्यासाठी माचिसची काडीसुद्धा फायदेशीर ठरते. मासिचच्या काडीत सल्फर असते जे किड्यांसाठी जीवघेणे ठरते.