How to choose best red mirchi or perfect chili for making red chili powder
वर्षभराचं तिखट करून ठेवण्यासाठी मिरच्यांची खरेदी करताना ४ गोष्टी लक्षात ठेवा- तिखट चवदार होईलPublished:March 5, 2024 07:26 PM2024-03-05T19:26:02+5:302024-03-05T19:30:11+5:30Join usJoin usNext वर्षभराचं तिखट करून ठेवण्यासाठी जर मिरच्यांची खरेदी करणार असाल तर कोणत्या गोष्टी आवर्जून तपासून पाहाव्या, ते बघा.. तिखटासाठीची मिरची पुर्णपणे वाळलेली असावी. हे तपासण्यासाठी कोणत्याही ४- ५ मिरच्या घ्या आणि त्या मधोमध हातानेच तोडून पहा. मिरची झटकन तुटली आणि तिच्यातून बिया अगदी सहज बाहेर आल्या, तर ती मिरची बिधास्तपणे खरेदी करावी. बेडकी जातवान, बेडगी रायचूर, बेडकी हवेरी, बेडकी बेलारी, संकेश्वरी, ब्याडगी, गुंटूर, काश्मिरी या तिखट बनविण्यासाठी काही प्रसिद्ध मिरच्या आहेत. त्यापैकी ब्याडगी , बेडकी मिरचीचे प्रकार आणि गुुंटूर मिरची या मिरच्या तिखट तयार करण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जातात. तसेच त्यांचा तिखटपणा आणि रंगही उत्तम असतो. ज्या मिरच्या कमी लांबीच्या असतात त्या तिखट असतात. तर ज्या अखूड असतात त्या कमी तिखट असतात. तुमच्याकडे कसं तिखट लागतं, त्यानुसार मिरच्यांची खरेदी करा. ज्या मिरच्यांची देठे पुर्णपणे वाळलेली असतात, अशी मिरची तिखट करण्यासाठी घ्यावी.टॅग्स :अन्नमिरचीखरेदीfoodChilliShopping