वर्षभराचं तिखट करून ठेवण्यासाठी मिरच्यांची खरेदी करताना ४ गोष्टी लक्षात ठेवा- तिखट चवदार होईल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2024 7:26 PM 1 / 5वर्षभराचं तिखट करून ठेवण्यासाठी जर मिरच्यांची खरेदी करणार असाल तर कोणत्या गोष्टी आवर्जून तपासून पाहाव्या, ते बघा..2 / 5तिखटासाठीची मिरची पुर्णपणे वाळलेली असावी. हे तपासण्यासाठी कोणत्याही ४- ५ मिरच्या घ्या आणि त्या मधोमध हातानेच तोडून पहा. मिरची झटकन तुटली आणि तिच्यातून बिया अगदी सहज बाहेर आल्या, तर ती मिरची बिधास्तपणे खरेदी करावी.3 / 5बेडकी जातवान, बेडगी रायचूर, बेडकी हवेरी, बेडकी बेलारी, संकेश्वरी, ब्याडगी, गुंटूर, काश्मिरी या तिखट बनविण्यासाठी काही प्रसिद्ध मिरच्या आहेत. त्यापैकी ब्याडगी , बेडकी मिरचीचे प्रकार आणि गुुंटूर मिरची या मिरच्या तिखट तयार करण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जातात. तसेच त्यांचा तिखटपणा आणि रंगही उत्तम असतो.4 / 5ज्या मिरच्या कमी लांबीच्या असतात त्या तिखट असतात. तर ज्या अखूड असतात त्या कमी तिखट असतात. तुमच्याकडे कसं तिखट लागतं, त्यानुसार मिरच्यांची खरेदी करा.5 / 5ज्या मिरच्यांची देठे पुर्णपणे वाळलेली असतात, अशी मिरची तिखट करण्यासाठी घ्यावी. आणखी वाचा Subscribe to Notifications